भाजप पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर जगात एक नंबरचा पक्ष — माजी आमदार अँड.संजय धोटे

44

🔹भाजपा स्थापना दिनानिमित्त भाजपा जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण करून केला स्थापना दिन उत्साहत साजरा

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि 6एप्रिल):-भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून या पक्षाचे सर्वात मोठे यश म्हणजे,भाजपा कार्यकर्ता,भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आज जगात एक नंबरचा पक्ष असून मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे या पक्षाचे नेतृत्व करत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी केले, भाजपा जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे पक्ष स्थापना दिनानिमित्त राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व पंडित दीनदयाळ उपाध्याय,डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी व माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना नमन करण्यात आले व मोठया उत्साहत साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमा प्रसंगी माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्यासह भाजपा जेष्ठ नेते विश्वास देशकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य अरुण मस्की, भाजपा जिल्हा सचिव वाघुजी गेडाम,भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय उपगनलावार,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,तालुका महामंत्री प्रशांत घरोटे,भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष स्वाती देशपांडे,माजी नगरसेवक राधेश्याम अडाणीया,माजी नगरसेवक राजेंद्र डोहे,माजी नगरसेविका उज्वला जयपूरकर,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजपचे मिलिंद देशकर,सुरेश रागीट,महादेव तपासे,ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,अनिल खनके,राजु उपलंचिवार,मंगेश श्रीराम,ग्रामपंचायत सदस्य रवि गायकवाड,प्रदीप बोबडे,प्रकाश आस्वले,कैलास कार्लेकर,कवडू ठेंगणे,रमेश मेश्राम,संदीप मडावी आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.