‘राज’ कारणात ब्राम्हणी ‘गज’करणाची ‘खाज’

30

छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर सुपुत्र, संस्कृत पंडित, शाक्तवीर संभाजी महाराजांची हत्या करून त्यांच्या हत्येचा आनंद म्हणून ब्राम्हणांनी गुढी पाडवा सुरू केला. खरा म्हणजे हा ब्राम्हणांच्या आनंदाचा क्षण तो बहुजनांच्या माथी मारण्यात आला. म्हणजेच आमच्या थोर राजाची मनुस्मृतीनुसार हत्या होते आणि त्याची गुढी उभारून बहुजन आनंद साजरा करतात, यासारखी ब्राम्हणांनी लादलेली गुलामी ती कोणती? त्या गुढी पाडव्याचा आनंद एक शुद्र असलेले राज ठाकरे शिवाजी पार्कवर मेळावा घेऊन साजरा करतात. राज ठाकरे यांनी स्वाभीमानाच्या गप्पा झोडल्या, मात्र स्वत:चा स्वाभीमान ब्राम्हणांकडे गहाण टाकलेल्या ठाकरेंच्या ‘राज’ कारणाला ब्राम्हणी ‘गज’ करणाची ‘खाज’ लागल्याने बहुजनांनी त्याला बळी पडू नये, कारण त्यांनी ब्राम्हणवाद मजबूत करण्याचा विडाच उचलला आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाचा आपण पोस्टमॉर्टम करू या.

राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे माथी भडकावणारे आहेत. त्यातील काही मुद्दे जे आहेत जे ब्राम्हणवादाला पोषक आहेत. एकप्रकारे त्यांनी ब्राम्हणवादाच्या प्रचारकाची भूमिका पार पाडली आहे. त्यांनी लोकशाही कशी असते याबाबत इंग्लंडचे उदाहरण दिले. विस्टन चर्चिल यांनी युध्दात विजय मिळवलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला. यातून त्यांना भारतातील लोकशाहीची तुलना करायची होती, परंतु भारतात लोकशाही नसून ब्राम्हणशाही आहे, ब्राम्हणशाहीमुळे देशात अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत हे त्यांनी सांगितले नाही. शेतकरी आत्महत्यांवर भाष्य करताना ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. ‘कारभार ऐसे करावा, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात न लागणे’. रयत म्हणजे कोण तर शेतकरी. म्हणजे शिवाजी महाराजांनी राज्य कारभाराची दिशा आखून दिली होती, त्यांच्या राज्यात एकाही शेतकर्‍याने आत्महत्या केली नाही. मग आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणार्‍या ब्राम्हणांच्या भाजपाने शेतकरीविरोधी कायदे केलेच ना..! याचा अर्थ शेतकर्‍याला उध्वस्त करण्याचे पाप हे ब्राम्हणांचेच आहे. त्यांनीच शेतकरी विरोधी नीती राबवली ना. कारण भारताचा शासक वर्ग ब्राम्हणच आहे.

तेच देशाची नीती ठरवतात. ही नीती बहुजनविरोधी असते. शिक्षणाचा झालेला बट्ट्याबोळ यावरही त्यांनी आपले विचार मांडले. शिक्षणाची नीती कोण ठरवते हे राज ठाकरेंना माहित नाही का? नवीन शैक्षणिक धोरणात पारंपरिक शिक्षण व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न आहे. पारंपरिक शिक्षण व्यवस्था म्हणजे दुसरी मनुस्मृती आहे. एवढेच कशाला धार्मिक शिक्षण लादून शिक्षणाचे ब्राम्हणीकरण करण्यात आले आहे. आता शिक्षणाचे ब्राम्हणीकरण झाले तर नोकर्‍या कशा मिळतील? कारण ब्राम्हणी शिक्षणात विज्ञानवादाला महत्व नाही तर पाखंडपणाचा स्तोम माजवला जातो. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येते. त्यामुळे आज जगात भारतातील एकही विद्यापीठ पहिल्या १०० मध्ये नाही. त्याला कारण ब्राम्हणांनी पोखरलेली शिक्षण व्यवस्था होय.

राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्याचे सुतोवाच केले आहे. अयोध्या म्हणजे बुद्धीस्टांचे सर्वात मोठे केंद्र साकेत आहे. त्यावर ब्राम्हणांनी कब्जा केला आणि आता तेथे राम मंदिर उभारत आहेत. जो राम काल्पनिक आहे. आणखी एका मुद्याला त्यांनी स्पर्श केला, तो म्हणजे ‘जात’..! जाती-पातीत गुंतून पडणार असू तर कुठले हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसलात? शेवटी राज ठाकरेंनी आपले हिंदुत्वाचे विखारी दात बाहेर काढलेच. हिंदू हा हिंदू-मुसलमान दंगलीत फक्त हिंदू असतो. २६ जानेवारी व १५ ऑगस्टला तो भारतीय होतो. राज ठाकरेंना सांगा देशात कुणीच हिंदू नाही, ज्या दंगली होतात ना त्या एससी-एसटी-ओबीसी विरूद्ध मुस्लीम. राज ठाकरे तरी स्वत: हिंदू आहेत का? ज्या ब्राम्हणांसाठी हिंदुत्वाच्या नावाखाली राज ठाकरे काम करत आहेत ते ब्राम्हणदेखील हिंदू आहेत का? हे त्यांनी ब्राम्हणांना विचारावे, बघा कसे उत्तर मिळेल. आणखी एक त्यांनी जावईशोध लावला. १९९९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रात जाती-पातीचं राजकारण सुरू झालं. याच्या आधी जात नव्हती का? होती असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर दुसर्‍या जातीचा द्वेष करायला लावला यांनी. आता या राज ठाकरेंना जाती कुणी निर्माण केल्या माहित नाही का? जगात माणसाच्या कुठेही जाती नाहीत, केवळ भारतात आहेत. त्या कुणी निर्माण केल्या विदेशी अल्पसंख्य ब्राम्हणांनी.

म्हणजे जनावरांची व्यवस्था माणसांवर लादण्याचे काम ब्राम्हणांनी केले. मग जातीचा निर्माता ब्राम्हण असताना त्याच्यावर न बोलता पवारांवर तोंडसुख घेताना राज ठाकरेंनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यात ब.मो. पुरंदरे नावाच्या बोगस शिवशाहीराची लक्तरे लोक वेशीवर टांगत असल्याने त्यांचा पिट्टू असलेल्या राज ठाकरेंना भलताच राग आलेला दिसतो. पुरंदरे म्हणजे यांचे सॉफ्ट टार्गेट असे ते म्हणाले. इतिहास आम्हांला वाचायचा नाही, लिहला कोणी? पुरंदरे-ब्राम्हण…अच्छा…अच्छा म्हणजे यांनी चुकीचे लिहले असणार अशी टीप्पणी राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे…! पुरंदरेंनी इतिहास चुकीचाच लिहला नाही तर सारा बिघडवून टाकला. म्हणून अशा पुरंदरेंसारख्या चुकीचा इतिहास लिहणार्‍या ब्राम्हणी पिलावळीला महात्मा राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी चांगलीच पाचर मारली आहे. ती पाचर म्हणजे ‘कलमकसाई’. म्हणजे ब्राम्हणांनी आपल्या लेखणीचा वापर एखाद्या कसायाप्रमाणे केला आहे. त्यात त्यांनी बहुजन महापुरूषांची बदनामीच केली आहे. हे राज ठाकरेंना माहित आहे. मात्र त्यांच्या मेंदूवर ब्राम्हणांनी कब्जा केला असल्याने त्यांना ब्राम्हण चांगले वाटत आहेत. आम्ही जातीमधून बाहेर कधी पडणार? आम्ही हिंदू कधी होणार? अशी आरोळी त्यांनी ठोकली आहे. जातीमधून बाहेर कधी पडणार हे भागवत, गडकरी, फडणवीस या ब्राम्हणांना विचारा, तेवढी विचारण्याची धमक आहे का? ब्राम्हण आजही आम्हांला हिंदू शब्दाचा वापर करून शिवी देतो आणि राज ठाकरेही त्याच शब्दाचा वापर करून बहुजनांना शिव्या देण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूचा अर्थ डाकू, चोर,लफंगा, लबाड असा आहे. तो भारतीय भाषेतला शब्द नसून पर्शियन शब्द आहे.

१९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जेम्स लेन जन्माला आला, कोण जेम्स लेन? असा सवालही त्यांनी केला. जेम्स लेनला चुकीची माहिती पुरवणारे हेच भांडारवर प्राच्यविद्या संस्थेतले ब्राम्हण, त्यात खास करून राज ठाकरेंचे गुरू ब.मो.पुरंदरे आहेत. खरे जेम्स लेन पुरंदरेच आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार्‍या ब्राम्हणांचा शिवाजी महाराजांनी कडेलोट केला असता. ज्याचा या देशाशी काहीच संबंध नाही, कशाचीही संबंध नसलेली माणसे येथे येतात, पुस्तक लिहतात, त्या पुस्तकावरून राजकारण केले जाते अशी टीप्पणी जेम्स लेनवर त्यांनी केली. जसा जेम्स लेनचा या देशाशी संबंध नाही तसाच बहुजन महापुरूषांच्या इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या विदेशी ब्राम्हणांचाही या देशाशी संबंध नाही. मॉंसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार्‍या ब्राम्हणांसमोर राज ठाकरे यांच्या तोंडाचे चंबुगबाळे झाले होते. त्यांनी तोंड शिवून घेतले होते. आता मात्र त्यांना भाष्य करावे लागत आहे. परंतु ब्राम्हणांना त्यांनी अभय दिले आहे. या देशात गझनीचा महमंद आला, अल्लाउद्दीन खिलजी आला, मोगलांचे आक्रमण झाले. मोगल, ब्रिटीश, पोर्तुगीज बाहेरून येऊन भारतावर आक्रमण केले तसेच ब्राम्हणांनीही युरेशियातून येऊन भारतावर आक्रमण केले. म्हणजे भारताची सिंधु सभ्यता नष्ट करण्याचे काम या हिंसक ब्राम्हणांनी केले. मग आक्रमणकारी ब्राम्हणांचा पुळका राज ठाकरेंना कसा काय येतो?
या देशाचा विकास झाला तर मोठे कोण होणार आहेत असे सांगताना हिंदू मोठा होणार आहे असे ते बोलले. अरे…ब्राम्हणांच्या पिट्टू राज ठाकरे हिंदू मोठा होणार नाही, हिंदू नावाखाली ब्राम्हण मोठा होणार आहे आणि एक दिवस तुमच्या पेकाटात लाथ मारणार आहे. शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्यामागे परकीय हात आहे का? अशी टीप्पणी त्यांनी केली. परकीयच हात आहे. कारण शेतीविषयक धोरण कोण ठरवतोय शासक वर्ग ब्राम्हणच. ब्राम्हण हा परकीय आहे. आजच्या शिक्षणामुळे मुलांना नोकर्‍या मिळत नाहीत त्यामागे ब्राम्हणांनी राबवलेली दळभद्री धोरणेच कारणीभूत आहेत. बेहराम पाडा आणि मदरसे यावर राज ठाकरे बोलणार नाहीत असे नाही. कारण त्यांच्या राजकारणाचा पायाच हिंदू -मुस्लीम आहे. मुस्लीमांना विरोध केल्याशिवाय त्यांचे राजकारण यशस्वी होणार नाही.

मदरसे आणि मशीदीत नेमके काय चालू आहे हे समजत नाही असे त्यांनी पिल्लू सोडून दिले. प्रार्थनेला माझा विरोध नाही, परंतु मशीदीवर लावलेले भोंगे खाली उतरावेच लागतील, नाहीतर ज्या मशीदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्या दुप्पट स्पिकर लावायचा आणि हनुमान चालिसा लावायची अशी धमकी देऊन त्यांनी तरूणांची माथी भडकावण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने धर्म घरात ठेवला पाहिजे असे ते बोलतात, मात्र स्वत: जगात अस्तित्वात नसलेल्या हिंदू धर्माचा उर बडवून हिंदू-मुस्लीम अशी दुफळी निर्माण करायची. आमच्याकडे मंदिरे आहेत, त्यावरही धाडी टाका…काय मिळणार? ‘घंटा’…! अशी खिल्ली त्यांनी उडवली. बरोबर आहे, मंदिरात घंटाच मिळणार, कारण मंदिरे ही ब्राम्हणांच्या पोटा-पाण्याचे धंदे आहेत. तेथे पैसा कसा मिळणार? आज भारतातील मंदिराचे उत्पन्न ८० लाख हजार कोटी आहे. हा सारा पैसा धर्माच्या नावाखाली बहुजन लोकांकडून ब्राम्हणांनी लुबाडलेला असतो. त्या मंदिरात बहुजनांकडून लुबाडलेला पैसा बेंबी तट्ट फुगली तरी ब्राम्हणांच्या पोटात जातो. यावर राज ठाकरे बोलणार नाहीत, त्यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘देवळाचा धर्म व धर्माची देवळे’ हे पुस्तक वाचले तर ब्राम्हणांच्या लबाड्या समजून येतील. परंतु ब्राम्हणी धर्माची गुलामी स्विकारलेल्या राज ठाकरेंना सांगणार कोण?

जसे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचा वापर ब्राम्हणांनी केला तसाच वापर आता राज ठाकरे यांचा केला जाणार आहे. ब्राम्हणांना हिंदुत्वाचा अजेंडा वाहून नेणारा राज ठाकरेंसारखा शुद्र माणूस मिळाला आहे. हिंदुत्वाचा अजेंडा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ब्राम्हणवाद मजबूत करण्याचा प्रयत्न आहे आणि राज ठाकरेंसारखा बोलका पोपट आयताच ब्राम्हणी पिंजर्‍यात अडकला आहे. म्हणून अनेक ब्राम्हणांनी राज ठाकरेंच्या भाषणाचे स्वागत केले आहे. ती स्क्रिप्टच ब्राम्हणांनी लिहली असावी.तसेच राज्यातील सत्ताधार्‍यांवर तोंडसुख घेताना अशा नादान राजकारणाला बळी पडू नका असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आमचेही म्हणणे असे आहे की, ब्राम्हणवादाचे वाहक असलेल्या नादान ‘राज’ कारण करणार्‍या ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला बहुजनांनी बळी पडू नये, नाहीतर अनेक पिढ्या बरबाद होतील.

✒️दिलीप बाईत,मंडणगड(जिल्हा रत्नागिरी)मो:-९२७०९६२६९८