युवा व नवीन सराफ वर्गाचा सन्मान करून, गुजरी मध्ये राम राज्य आणुया

31

🔹डॉ.अग्रवाल यांच्या प्रचारार्थ “चाय पे चर्चा”कार्यक्रम: प्रशांत अग्रवाल

✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.7एप्रिल):- विकासाच्या वाढत्या आलेखात युवा व नवीन सराफ व्यापाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. मात्र युवा व नवीन व्यापाऱ्यांना राजकारणातील काय करते? असे म्हणून सत्तेतील लोकांकडून अनेकदा युवा व नवीन व्यापाऱ्यांचा अपमान केला जात आहे. त्या युवा व नवीन व्यापारांना कमी लेखताना सराफ संघटनेची स्थापना युवा व नवीन व्यापारी केली होती याचा आता सत्तेतील लोकांना विसर पडला आहे. कोल्हापूर सराफ मतदार संघातील उमेदवार डॉ. सुशील अग्रवाल यांच्या विजयाच्या रूपाने युवा सन्मान करूया आणि गुजरी मध्ये राम राज्य आणूया, असे आवाहन गुजरी तील ज्येष्ठ व्यापारी प्रशांत अग्रवाल व अनेक व्यापाऱ्यांनी उद्गारले.कोल्हापूर गुजरी मधील कासार गल्ली येथे सर्व मित्रमंडळातर्फे उमेदवार डॉ. सुशील अग्रवाल यांच्या प्रचारार्थ आयोजनात “चाय पे चर्चा”या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रशांत अग्रवाल म्हणाले, कोल्हापूर सराफ मतदार संघातील निवडणुकीत मागील उमेदवारांनी युवा व नवीन व्यापाऱ्यांना अवमान करणारे शब्द केले आहे. युवा व्यापाऱ्यांचा अवमान करणाऱ्या, सामान्य माणसांना, गुजरी ची प्रगती थांबणाऱ्या व खाईत लोटणार्‍या अहंकारी रावण चा नाश करण्याची वेळ आली आहे.अनेक सराफ व्यापारी म्हणाले, स्व. अग्रवाल (मामा) यांनी कोल्हापूर सराफ संघाच्या विकासाची भूमिका सातत्याने मांडली. त्यांच्या मनात गुजरी ची वेगळी ओळख निर्माण करणारे अनेक प्रकल्प होते. विकासाचा हा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचे भाचे डॉ. सुशील निवडणूक लढवीत आहेत. कोल्हापूर सराफ संघामध्ये पहिल्यांदा युवा उमेदवार निवडून देण्यासाठी डॉ. सुशीला अग्रवाल यांना साथ देऊया.यावेळी डॉ सुशील अग्रवाल म्हणाले, मामांचा राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर होता. उद्योगवृद्धी, पर्यटन व क्रीडा विकासासह युवा पिढीच्या हितासाठी ते सदैव कार्यरत होते. त्यांचे हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खंबीरपणे ही निवडणूक लढवत आहे. तरी सर्वांनी मला काम करण्याची एक एक संधी द्यावी.