हर हर महादेव एक बार शंभूच्या नावान हार बोला ..असा जयघोष करत आरळीत महादेव काठी उभारून गुढी पाडवा उत्साहात साजरा

32

✒️नायगाव विषेश प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650

बिलोली(दि.7एप्रिल):-तालुक्यातील आरळी येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी पारंपारिक संस्कृतीच जतन करून गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला गावातील आराध्यदैवत शंभुमहादेव, ग्रामदैवत हानुमंतराय,गावदेव, यांच्यासह सर्व दैवताना नववर्षानिमित्य वाजत गाजत नारळ फोडण्यात आले महादेव काठी महादेव मंदिरावर उभारण्यात आली गावातील सालगडी, छोटी मोठी आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात जुन्याचे नवे करून नवीन वर्षाला सुरुवात झाली गावातील परोहीतअंतेश्वर स्वामी बुवा मारुती मंदिरावर बसून सालभराची भविष्यवाणी वर्तवली..यंदा नंदसारी नावाचा नागरिक आहे.

खरिपीचा स्वामी शनी आसल्याने पाऊस कमी पडून रोगराई, आग,चोरी.चा त्रास सहन करावा लागेल,तसेच रबीचा स्वामी शुक्र आसल्याने फुले फळे, थनधान्य पिकेल लोक समाधानी होतील पशुपालक बलभद्र आसल्याने स्वधर्माचे पालन करतील यंदा माळयाच्या घरी पाणी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे त्यामुळे भरपूर पाऊस पडेल सुगी चांगली पिकेल अशी वार्षिक भविष्यवाणी वर्तुन आनंद वातावरण निर्माण केले यावेळी बिलोली पंचायत समितीचे मा सभापती दत्तराम बोधने,सरपंच प्रतिनिधी.सदशिव पा बोडके,मानकरी भुजंग पा लाकडे, शिवानंद चिवटे, गगांधर, व मोहन मुंडकर आदींसह उपस्थित होते….