मोर्शी वरुड तालुक्यातील १३ गावातील विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर !

35

🔹आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील विकासकामे पूर्णत्वास जाणार !

🔸आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला ५ कोटींचा निधी !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.9एप्रिल):- विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते, सभागृह बांधकाम, चौक सौंदर्रीकरण, स्मशानभूमी बांधकाम करणे इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत २५१५ योजनेमधून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली आहे.
मोर्शी विधानसभा मतदारसंघात आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला आहे. विरोधकांनी विकासाबाबत चिंता करण्याची गरज नाही. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर सरकारकडून निधी खेचून आणून विकासमय मतदारसंघ झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकारामुळे मोर्शी वरुड तालुक्याची विकासाची घोडदौड सुरु आहे. त्यांच्या पाठपुराव्यातून मोर्शी वरूड तालुक्यातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ता, सभागृह बांधकाम, चौक सौंदर्रीकरण, स्मशानभूमी बांधकाम करणे यासह इतर कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील नागरीकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.मागील दोन वर्षांपासून राज्यातील कोवीडच्या संकटातही आमदार देवेंद्र भुयार यांनी विकास कामांना प्राधान्य देत, त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.

2515 योजनेंतर्गत 2021- 22 या आर्थिक वर्षासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी उपलब्ध झालेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीतून मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागात ३ कोटी ६० लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून वरुड तालुक्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४० लक्ष रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.
त्यामध्ये रिद्धपुर ५० लक्ष, अंबाडा ५० लक्ष, हिवरखेड ५० लक्ष, दापोरी ३० लक्ष, खेड ३० लक्ष, पिंपळखुटा मोठा ३० लक्ष, येरला ३० लक्ष, उतखेड ३० लक्ष, चिंचोली गवळी ३० लक्ष, पार्डी ३० लक्ष, वरुड तालुक्यतील लोणी ५० लक्ष, जरूड ५० लक्ष, बेनोडा ४० लक्ष रुपये मंजूर करून मोर्शी, वरुड तालुक्यातील अंतर्गग रस्ते, सभागृह बांधकाम करणे, चौक सौंदर्यीकरण करणे, इत्यादी विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आला आहे. मोर्शी वरुड तालुक्यामध्ये नव्याने होणाऱ्या या कामांमुळे मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होणार असल्याने, मोर्शी वरुड तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणाची चांगली सुविधा निर्माण होणार आहे.

कोणी काहीही बोलून टीका करून मला बदनाम करू द्या, माझ्या बाबत कितीही गैरसमज पसरविण्याचे काम करु द्या मी त्याला सोशल मीडियावर उत्तर न देता मतदारसंघाच्या विकास कामातून योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, कारण राजा जेव्हा शरण येत नाही तेव्हा त्याला अनेक मार्गाने बदनाम केले जाते तेच काम मतदारसंघातील माझे हितचिंतक करत आहे. पण मी त्याची तमा बाळगत नाही माझी एकाग्रता फक्त मतदारसंघातील विकास कामांवर आहे. आणि त्यासाठी मी वाट्टेल ते प्रयत्न करून विविध मार्गाने निधी खेचून आणत आहे आणि मतदारसंघातील विचारवंत सुज्ञ नागरिकांना त्याची जाणीव झालेली असून ते माझा कामाची निश्चित दखल घेत आहे. —— आमदार देवेंद्र भुयार