महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापणाऱ्या शिक्षकाला निलंबित करा- रिपब्लिकन युवा सेना मागणी

74

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.9एप्रिल):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जिल्हा परिषद शाळा विडुळ येथे 14 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी 6/4/2022 रोजी गेले असता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरून तसेच डॉ. बाबासाहेबांच्या सर्व अनुयायांचा अपमान जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा (मुले) येथील शिक्षक अशोक गोविंदराव मुक्कावार यांच्याकडून करण्यात आला.

तरी शिक्षक मुक्कावार यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. अशी मागणी रिपब्लिकन युवा सेनाकडून गट शिक्षणाधिकारी उमरखेड यांना निवेदना मार्फत करण्यात आली आहे.

अन्यथा रिपब्लिकन युवा सेना उमरखेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी शुद्धोधन दिवेकर (शहराध्यक्ष उमरखेड), सुनिल पाटील चिंचोलकर (जिल्हा प्रमुख यवतमाळ) भीमराव खंदारे (तालुका उपाध्यक्ष), प्रफुल दिवेकर (सामाजिक कार्यकर्ते), संदीप राऊत (तालुका संघटक) किरण दवणे, योगेश दिवेकर, मंगेश दिवेकर व रिपब्लिकन युवा सेनेचे तालुका पदाधिकारी उपस्थित होते.