हनुमान जयंती सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे विणापुजन- पी.एस आय अंकुश माने, जालिंदर भाऊ लांडे यांच्या हस्ते..

31

✒️नानासाहेब ननावरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.10एप्रिल):– कुरुल ता.मोहोळ हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह निमित्त विणा पूजन सरपंच माणिक राजाराम पाटील, पंचायत समिती सदस्य जालिंदर भाऊ लांडे, कामती पोलिस स्टेशनचे पी.एस.आय. अंकुश माने यांच्या हस्ते करण्यात आलं.

हनुमान पूजा गहिनीनाथ अण्णा जाधव, ज्ञानेश्वर माऊली चे पूजन माजी उपसरपंच दत्तात्रय आनंदा जाधव, सरपंच जनार्दन नारायण ननवरे, विठ्ठल रुक्माई चे पूजन छत्रपती गोविंद जाधव, पूजन चंद्रसेन बापु जाधव मृदंग पूजन लिंगेश्वर तात्या निकम, प्रकाश आप्पा पाटील तुकाराम महाराज प्रतिमेचे पूजन पांडुरंग आबा जाधव, सुभाष माळी, भारत माने, किसन देव दर्याबा जाधव, ज्ञानेश्वर कदम, बाबासाहेब जाधव, माऊली जाधव सर, कृष्णदेव पाटील. यांचे हस्ते संपन्न झालं. ह. भ. प. सुनिल महाराज फतकि, व्यासपीठ चालक ह-भ-प बलभीम महाराज लांडे पारायण प्रमुख ह. भ. प विठ्ठल माने, हरिनाम सप्ताह मधील रोज नित्यनेमाने सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ सायंकाळी 6 ते 8 प्रवचन व रात्री 9 ते 11 हरिकीर्तन आणि रात्री 11 नंतर हरिजागर व पहाटे 5 :30 ते 6:30 काकडा अशाप्रकारे हरिनाम सप्ताहाचे स्वरुप आहे.

9 एप्रिल ते 16 एप्रिल रोज प्रवचन, कीर्तन, जागर,भारुड आणि रोज अन्नदान सकाळी व संध्याकाळी कुरुल ग्रामस्थांकडून व सप्ताहाची सांगता १६ एर्फिल रोजी हनुमान जन्मोत्सव दिवशी सायंकाळी जंगी कुस्तीच्या स्पर्धेने सांगता होते. अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वर पारायण सोहळा संयोजक कुरुल ग्रामस्थ व नागनाथ वसमाळे ,औदुंबर साळुंके, सुनिल आंबरे, महादेव महाराज माळी, सौदागर अप्पा जाधव ,गजानन वेळापुरे, दिलीप कदम, शंकर गुरव, शिवा गुरव, रोहित साळुंके, त्रिंबक पाटील ,संतोष कानडे ,विठ्ठल लामतुरे, श्रीरंग लामतुरे व ग्रामस्थ व हनुमान भजनी मंडळ