श्रीगुरूदेव सेवाश्रमात राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाची सभा संपन्न

33

✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागपूर(दि.10एप्रिल):-श्रीगुरुदेव सेवाश्रम अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाची सभा नुकतीच सेवाश्रमात ज्येष्ठ साहित्यिक डाॕ. बाळ पदवाड यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.याप्रसंगी सेवाश्रमाचे अध्यक्ष एड. अशोक यावले, ज्येष्ठ साहित्यिक श्री. सुरेंद्र बुराडे, डॉ.गणेश चव्हाण, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे माजी उपसर्वाधिकारी रूपराव वाघ, राजेश कुंभलकर, विठ्ठलराव पुनसे , दिलीप सुरकार आदींची उपस्थिती होती.

प्रास्ताविक राजेश कुंभलकर यांनी केले. यासभेत या महिन्यात होत असलेल्या ग्रामजयंती महोत्सव कार्यक्रमाबाबत , भविष्यात होणाऱ्या राष्ट्रसंत साहित्य संमेलन आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाळ पदवाड यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मानव मित्र सेवाव्रती पुरस्कार देऊन ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर (गडचिरोली) यांचा सत्कार करण्यात आला