ई-मेल करा आणि वाईन निर्णयाविरुद्ध हरकती नोंदवा! – शिवकुमार केदारी

30

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.11एप्रिल):-महाराष्ट्र सरकारद्वारे सुपर मार्केट (किराणा), मॉल आदी ठिकाणी सरसकट वाईन उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. जनतेचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेऊन सरकारद्वारे सामान्य नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदविण्याचे नुकतेच आवाहन करण्यात आले आहे. येवढा विरोध होऊनही शासनाने निर्णय रद्द न करता अशा प्रकारे उपाय योजून तो पुढे नेण्याचा प्रयत्नच आहे. ’वाईन हितसंबंध’ जपणार्‍या सरकारमधील घटकांचा दुरहेतू लक्षात येतो. तरीही समन्वय मंचातर्फे आपण या निर्णयाचे स्वागतच केलेले आहे. आपण व नागरिकांनी गाफील राहून चालणार नाही. एकदा जर निर्णय लागू झाला तर तो रद्द करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष सोपा नसतो.

तो  म्हणून आमची सर्व नागरिकांना नम्र व आग्रहाची विनंती आहे की, फक्त दोन मिनिटे आपला वेऴ काढून या निर्णयावर आपली हरकत नोंदवावी. घरी बसल्या आपल्या मोबाईल मधूनही  ईमेल पाठवू शकतात. खाली दिलेल्या ईमेल व पत्त्यावर आपण जरूर आक्षेप नोंदवाल. आपल्या सर्वांच्या सहभागानेच आपण ही लढाई जिंकणार आहोत. सरकारचा हा निर्णय रद्द करण्यासाठी नागरिकांनी आपल्या हरकती
dycomm-inspection@mah.gov.in या ई-मेलवर अथवा आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क- महाराष्ट्र राज्य, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – 400023 या पत्त्यावर टपालाद्वारे नोंदवाव्यात तसेच आपल्या हरकतीच्या प्रती आपण माहितीस्तव maharashtraagainstwine@gmail.com वरही पाठवाव्यात, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता शिवकुमार केदारी हिंद नगर परळी वै यांनी केले आहे.