मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

32

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

पिडीत आणि वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या महात्मा फुल्यांचे विचार समाजाला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणारे – भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

आज सकाळी घुग्घुस येथील मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्त्री शिक्षणाचे प्रणेते, महान समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली केली. विधवा पुनर्विवाह सारख्या चांगल्या प्रथेचे त्यांनी समर्थन केले. देशात अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरांवर घणाघात करुन त्यांनी प्रबोधनाची चळवळ उभारली. शेतकरी, कष्टकरी, महिला व उपेक्षित बांधवांना हक्कांची जाणीव करुन देत त्यांना लढण्याचं बळ दिलं. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सर्वप्रथम महात्मा फुल्यांनी शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली.समाजातील पिडीत आणि वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा जोतिबा फुल्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांचे विचार खऱ्या अर्थाने समाजाला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत. असे मत याठिकाणी बोलताना व्यक्त केले.

याप्रसंगी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी ग्रामपंचायत सिनू इसारप, सागर आकापेल्ली, सौ. शारदाताई झाडे, सौ. सुनंदाताई लिहीतकर, अमोल तुळसे, शितल कामतवार, खुशबू मेश्राम, लता आवारी, भारती पर्ते, स्वाती गंगाधरे यांसह आदि मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.