महाराष्ट्राव्यापी- मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाची स्थापना!

30

🔹दापोलीतील- महाजन बिल्डकॉनचे संचालक मिहीर महाजन यांची समिती सदस्य म्हणून नियुक्ती!

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.17एप्रिल):- गेले 20 वर्षांपासून, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन नावाने मराठी बिल्डर्स-डेव्हलपर्स एकत्रित रित्या काम करत असत.नुकतेच या संस्थेला मोठे रूप देत, महाराष्ट्रव्यापी अशा “मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाची स्थापना करण्यात आली आहे.” या कार्यक्रमास खासदार छत्रपती संभाजीराजे,प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक सतीश दादा मगर आदि.मान्यवर उपस्थित होते.

मराठी बिल्डर्स डेव्हलपर्स ची एक शिखर संस्था म्हणून ही संस्था काम करेल.महासंघाच्या चेअरमनपदी डॉ.सुरेश हावरे, अध्यक्ष- श्री.एस.आर.कुलकर्णी(पुणे), उपाध्यक्ष-डॉ.अजित मराठे(निर्माण ग्रुप) ई. सह अन्य पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.यामध्ये, समिती सदस्य म्हणून दापोलीतील बांधकाम व्यावसायिक, महाजन बिल्डकॉनचे संचालक श्री.मिहीर महाजन यांची नियुक्ती झाली आहे.

येणाऱ्या काळात, बांधकाम व्यवसायात मराठी तरुण उद्योजक तयार व्हावेत, मराठी बांधकाम व्यासायिकांचे प्रश्न समस्या एकत्रित येऊन सोडविले जावेत यासाठी आपण या महासंघाच्या माध्यमातून सक्रिय काम करणार असल्याचे मिहीर महाजन यांनी सांगितले.
या महासंघाच्या अंतर्गत आगामी काळात राज्यभर स्थानिक शाखा देखील गठीत केल्या जाणार आहेत.