परळी नगर परिषदेने उन्हाळ्यातील पाणी टंचाई पडण्यापुर्वी शहरातील बंद पडलेले नादुरूस्त झालेले सर्व हातपंप (हापसे) दुरूस्त करावेत ;- सौ.वर्षा मगर

31

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी वैजनाथ(दि.17एप्रिल):- परळी नगर परिषदने परळी शहराला पाणी टंचाई पडण्यापूर्वी परळी शहरातील सर्व बंद पडलेले नादुरूस्त झालेल्या हातपंपाची (हापस्याची) दुरूस्ती करावी जेणे करून शहराला पाण्याची कमी भासणार नाही असे मागणी कांतीकारी साथी च्या मुख्यसंपादक,जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ.वर्षा मगर यांनी पत्रकाद्वारे केले आहे .

त्यापुढे म्हाणाल्या की परळी शहराला सध्या उन्हाचा तीव्र सामना करावा लागत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पाणी टंचाई प्रश्न नाकारता येत नाही परळीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात आज पाणी मुबलक असले तरी सगळ्यानांच नळाचे पाणी मिळत नाही अनेक ठीकाणी नळाची नविन जोडणी सुध्दा झालेली नाही या अशा अनेक करणामुळे भविष्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून परळी नगर परिषदने शहरातील सर्व नादुरूस्त हातपंप (हापसे) व बंद पडलेले हातपंप हापसे दुरूस्त करावेत अशी विनंती कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ.वर्षा मगर यांनी केली आहे.