क्रांतीगर्भ

30

जगाचा पोशिंदा
शेतकरी………
आंदोलनरत असतांना
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी
आपल्या हक्कांसाठी…..
सर्वसामान्य भारतीय मात्र
निद्रीस्त होते
गाढ झोपेत होते
या आंदोलनाशी आपले
काहीही देणे-घेणे नाही
असेच त्यांचे वर्तन होते…
या आंदोलनाने शेतकरी
झाला होता हवालदिल
निघाला होता होरपळून
ऊन, थंडी, वारा, पाऊस, कोरोना रोगराईचा
विचार न करता
तन, मन, धनाला
झोकून दिले होते शेतकर्‍याने
आपल्या न्यायहक्कांसाठी……
अशा या विदारक वर्तमानात
दोन संवेदनशील भारतीय
डोळे, कान सताड उघडे असणारे
आंबेडकरी अनुयायी
निर्माते संदीप गायकवाड
दिग्दर्शक नागेश वाहूरवाघ
विडा उचलतात
निद्रेत असणाऱ्या
गाढ झोपेत असणाऱ्या
संवेदनाशुन्य देशवासियांना जागविण्याचा
निर्मित करतात लघुचित्रपट
क्रांतीगर्भ….
शेतकरी आंदोलनाकडे
लक्ष वेधणारा लघुचित्रपट
क्रांतीगर्भ…..
आहेत संवैधानिक मुल्ये
हीच मौलिक जीवनमूल्ये
भारतीय लोकशाहीची प्राणतत्वे
हा संदेश देणारा लघुचित्रपट
क्रांतीगर्भ…….
सांप्रतच्या काळात
उसवु नये
बंधुभावनेची वीण
उसवु नये
बंधुता, एकता, समतेचे
भरजरी, रेशमी वस्त्र भारत
निखळू नये
जगाच्या शिरपेचातील
कोहीनूर हिरा भारत
याकरीता भिनायला पाहिजेत
संवैधानिक मुल्ये
आपल्या आचार-विचारात
उदात्त हेतुने या
संविधान जागराचे महत्व
अधोरेखित करतो लघुचित्रपट
क्रांतीगर्भ…….
आपल्या आजुबाजूला
काय घडतयं
याकडे डोळसपणे बघायची
शिकवण देतो लघुचित्रपट
क्रांतीगर्भ…..
लेखणी, वाणी ही शस्त्र
कशी उपसावी प्रभावीपणे
जनजागृतीसाठी, न्यायहक्कांसाठी
याची ध्वनीचित्रफित
क्रांतीगर्भ…….
पारितोष हजारे या प्रतिभावान संगीतकाराने कम्पोजिशन केलेले.
साहिल गौरवे यांनी गायलेल्या ‘मेरी मिट्टी’
या कर्णमधुर गीताने
हृदयाचा ठाव घेतो
क्रांतीगर्भ…..
अश्विन नाईक, देवेंद्रपालसिंग सिद्धु
विकल जिल्हेकर, डॉ. नीना वानखेडे
सम्राट अशोक, कुमुद चोखान्द्रे
चक्षुपाल जामनिक, बबीता डोळस
अरमान खान, सुबोध आनंद
अभिलाष विश्वकर्मा, साहिल गौरवे
नेहाल उमरे, आरती नगराळे
सुमेध मुजमुले, आभास मखरे
या प्रतिभावान, कसदार कलावंतांनी
आपआपल्या व्यक्तीरेखांना
न्याय देऊन
आशयगर्भ केलेला लघुचित्रपट
क्रांतीगर्भ….
ज्या लघुचित्रपटाने
समस्त भारतीय
धर्म, जात, पंथ, प्रांत विसरून
म्हणतील एकसुरात
हमारा संविधानही
हमारा प्रमाणग्रंथ है
तो लघुचित्रपट म्हणजेच
क्रांतिगर्भ…….

✒️सुधीर बाराहाते ‘भिमसूत'(मो. नं. 8983024738)