गेवराई तालुक्यात गांजाची शेती करणाऱ्यावर पोलीस व महसुल प्रशासनाची धडक कारवाई

33

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.18एप्रिल):- तालुक्यातील तलवाडा परिसरात गांजाची शेती असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड,नायब तहसीलदार प्रशांत जाधवर,यांच्या सह तलवाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, यांनी घटनास्थळी तात्काळ जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी गांजाची शेती आढळून आली.त्यामुळे तात्काळ धाड टाकत कारवाई करण्यात आली.यामध्ये 18 किलो वजनाची लहान मोठे, 21 झाडे जप्त करण्यात आली.

यावेळी गांजाची शेती करत असलेला बाळू अंकुश खवाटे याला ताब्यात घेण्यात आले आहे.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.या कारवाई च्या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड,नायब तहसीलदार प्रशांत जाधवर,यांच्या सह तलवाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे,उपनिरीक्षक बाळासाहेब भुवर,बीट अंमलदार सचिन अलगट, मंडळ अधिकारी. तलाठी, पोलीस कर्मचारी राऊत,गायकवाड,खंडागळे,आदी उपस्थीत होते.