कोळवाडी फाट्यावर अपघात एक ठार; एक जखमी

28

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.19एप्रिल):-मोटारसायकलवर बीडकडे येत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी कोळवाडी फाट्याजवळ घडली.

दत्ता फकीर कोलगुडे व बंकट कोंडीबा मुळीक हे दोघे आपल्या गावाकडून बीडकडे मोटारसायकलवर येत होते. त्यांच्या गाडीला कोळवाडी फाट्याजवळ अन्य एका वाहनाने जोराची धडक दिल्याने या अपघातात दत्ता फकीर कोलगुडे (वय 40, रा. मांजरसुंबा) यांचा मृत्यू झाला तर बंकट कोंडीबा मुळीक (रा. करचुंडी) हे जखमी झाले. जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.