निलज येथे भागवत सप्ताहाची उत्साहात सांगता- खासदार अशोक नेते यांची उपस्थिती

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.19एप्रिल):-ब्रम्हपुरी तालुक्यातील निलज येथे सार्वजनिक हनुमान मंदिर तथा समस्त निलज ग्राम वासीय जनतेच्या वतीने ज्ञानयज्ञ भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या श्रीमद् भागवत सप्ताह समारोपाची सांगता मोठ्या उत्साहात शनिवार दिनांक 16 एप्रिल 2022 ला झाली.

यावेळी खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रीष्णा सहारे, संजय गजपुरे, माजी सभापती रामलाल दोनाडकर,अरुण शेंडे, अण्णा ठाकरे,डॉ.गोकुल बालपांडे, प्रमोद चिमुरकर व उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून निलज गावात यावर्षी पहिल्याच संपूर्ण गावातर्फे एकच कार्यक्रम झाल्याने ग्रामवासीयांना शुभेच्छा दिल्या.

गोपाल काला व भागवत सप्ताह समारोपिय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद चिमुरकर, वंदनाताई शेंडे ,प्रा.अशोक सालोटकर ,प्रभाकर सेलोकर , सुजित बालपांडे, उत्तम बनकर ,संजय कार, महेंद्र भुते, प्राचार्य डी. एम चौधरी, नानाजी तुपट , रघुनाथ सोंदरकर, देवचंद ठाकरे,रवींद्र ढोरे, सुचित्राताई ठाकरे, देवानंद बगमारे,अक्षय चहांदे,चंद्रगुप्त चहांदे, ताराचंद पारधी,राजू शिवूरकार, इ.मान्यवर व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

भागवतकर ह. भ. प. सुनील महाराज यांनी आपल्या गोड वाणीने उपस्थितांना भागवताचे महत्त्व सांगितले. भागवतकर ह. भ. प. सुनील महाराज ग्रामस्थांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भागवत सप्ताहाचा समारोपिय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील महिला, तरुण, जेष्ठ नागरिक यांनी मोलाचे सहकार्य केले.