प्रा. श्रावण बानासुरे आचार्य पदवीने सन्मानित

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.20एप्रिल):-कला वाणिज्य महिला महाविद्यालय बल्लारपूर येथील प्रा. श्रावण राजेरामजी बानासुरे यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून इंग्रजी विषयात आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे.त्यांनी ‘ किरण नगरकर यांच्या कादंबरीतील चाळ संस्कृती ‘ या विषयावर संशोधन केले आहे. सदर संशोधन त्यांनी पोंभुर्णा येथील चिंतामणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नदीर खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.

आचार्य पदवी प्राप्त झाल्या बद्दल संस्थेचे सचिव डॉ. अनिल शिंदे, अध्यक्ष श्रीकांत चहारे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.केवट , त्यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई बानासुरे , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, एड. राजेंद्र जेनेकर , विलास उगे, कवी अरूण झगडकर , लक्ष्मण खोब्रागडे तसेच सर्व कर्मचारीवृंदानी अभिनंदन केले आहे.
प्रा. श्रावण बानासुरे हे राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे कार्यकारीणी सदस्य असून अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाद्वारा संचालित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा समितीचे ते बल्लारपूर तालुका प्रमुख आहेत.