(लोकवर्गणीतून सोन्याचा पुतळा उभारू)

विश्वरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लातूर शहरात बसवलेला पुतळा इतक्या घाई गडबडीत का बसवला ?
एक तर भल्या मोठ्या आकाराचा पुतळा. वेळेची कमतरता.
भारत भाग्य विधाते परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोणी बसविण्याचा आग्रह धरला होता ? की स्वतः कडे खूप पैसे आहेत हे दाखवण्याचा मानस होता ?

तुम्ही कोटी नाही, तुम्ही 1हजारात् पुतळा बनवा, पण तो सुरेख, सुंदर आणी राजबिंडा बनला पाहिजे, पुतळ्याचे सौन्दर्य गायब करून विद्रुप पुतळा बसवण्याचा तुमचा अट्टहास् का?या देशाच्या, माझ्या, बहुजनांच्या बापाचे म्हणजेच विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे विडंबन करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला???
आधी या प्रश्नाचे उत्तर द्या.

तुम्हाला बसवायचा होता तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रांझ चा पुतळा एक – दोन – तीन वर्षा च्या सवडी मध्ये तयार करायचा होता.
इतक्या घाई घाई मध्ये विद्रूप चेहरा, ज्या पुतळ्याला मान सुद्धा नाहीये, आणी पाय तर मूडदुस रोग्या सारखे बनवून असा अपमानित करणारा बाबासाहेबांचा पुतळा आदरणीय खासदार साहेबांनी उभारण्याचे कारण काय??

पुतळ्याचा परवाना तर 30 एप्रिल पर्यंतच आहे असं ऐकिंवात आहे, 30 तारखे नंतर पुढे आता काय?हा पुतळा पीओपी आणि फायबर अशा मिश्रणाचा आहे अस आपणच सांगत आहात. मग या पुतळ्याच वास्तव्य किती दिवसाच असणार आहे.पुतळा बनवणं सोप आहे परंतु त्याचा सांभाळ करणे खूप अवघड आहे.कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव भारतातील विश्वाचे नेते आहेत. म्हणून अश्या महामानवाचा पुतळा बनवत असताना त्याच्या परिणामाचा विचार करायला हवा होता.

अस समजते की 30 एप्रिल 2022 नंतर आंबेडकर पार्क हून हा पुतळा हटवण्यात येणार आहे.

मला अस वाटत डॉ. बाबासाहेब काय तुमच्या घरचे आहेत काय? डॉ. बाबासाहेब सर्वाचे आहेत, या देशाचे आहेत. या विश्वाचे आहेत.

पुतळा बनवतांना तो तुमचा तुमच्या मालकीचा असेल पण जेंव्हा त्याचे लोकार्पण होते तेंव्हा तो तुमचा राहत नाही. तो लोकांचा होतो. म्हणजे माझा, माझ्यासारख्या आंबेडकरी अनुयायांचा होतो.

आता तो पुतळा तेथून कदापी हटवता येणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही आमची अस्मिता आहे. आमचा जीव की प्राण आहे. डॉ. बाबासाहेब व त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी आम्ही आमच्या प्राणाची आहुती देऊ शकतो.
आता काय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही गणपती करणार आहात की काय???

पुतळा काढत असताना तुम्ही अर्थातच त्या पुतळ्याला करवत लावणार त्याची तोडफोड करणार, हातोडा घालणार म्हणजे आधीही विडंबन आणी नंतरही विटंबन. मात्र: आता असा अपमान आंबेडकरांना माणणारा व्यक्ती सहन करणार नाही. महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देश पेटून उठेल, नव्हे विश्व पेटेल.

चहा विकणारे नरेंद्र मोदी रेल्वे स्टेशन वर चहा विकून प्रधान मंत्री झाले तसेच छ. शिवाजी महाराज चौकात उभा राहून मिस्त्री काम करणारे आज तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधांनामुळे खासदार झालात.
हे विसरू नका.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधांनाने तुम्हाला राखीव जागा दिल्या त्या जागेवर भाजप या जातीवादि पक्षाच्या तिकिटावर उभा राहून राखीव मतदार संघातून पैशाच्या जोरावर आणी मोदी च्या लहरीमधून निवडून आलात.

जसा पैसा निवडणुकीत दाखवुन तुम्ही निवडून आलात
तसा पैसा आमच्याकडे भरपूर आहे अस समजून जर तुम्ही
डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा तोडनार असाल तर याचे परिणाम फार गंभीर होतील. कोणी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. कोणी कायं मीच तुम्हाला सळो की पळो करेल. लक्षात ठेवा.

खरंच असेल हिम्मत तुमच्यात तर खरंच 30 एप्रिल 2022 ला तेथून पुतळा काढून दाखवा. आणी खरच जर तुम्ही डॉ. आंबेडकरांची औलाद असाल तुम्ही शासन प्रशासना कडून टेक्निकल परवाना मिळवा जेणेकरून पुतळा कायम कसा करणार याकडे ताकद लावा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्याच्या माध्यमातून
व्यंग करण्याचा अधिकार तुम्हाला, तुमच्या सहकाऱ्यांना आणी विशेषतः त्या मूर्तिकाराला कोणी दिला. या मूर्तिकाराच्या तर दोन्ही हाताची बोटेच छाटावी अस वाटत आहे, पण मूर्तिकार चुक लवकर सुधारत असल्यास कायदा मोडण्यात कायं अर्थ???

खासदार साहेब स्वतः जवळचे पैसे खर्चून ही फार मोठी घोड चुक तुम्ही केली आहे. तुमची चुक क्षमा योग्य तर मुळीच नाही पण समाजाची तुम्हाला जाहीर माफी मागावी लागेल अस मला वाटत. तुम्हाला तुमची चुक कळली असेल तरच…

माझं अजून एक म्हणण आहे की, ज्या महामानवामुळे आज आपण महालात राहतोय, थाटामाटात् राहतोय त्यांचा ब्रांझ चा तर पुतळा कशाला??? सोन्याचा का नको??? माझी विनंती आहे तुम्हाला मला जागा उपलब्ध करून दया. मी आंबेडकरी समाजाला प्रत्येकी 1 ग्राम सोन्याची मागणी करतो, आणी भारतातून नव्हे पण फक्त महाराष्ट्र राज्यातून 1 ग्राम सोन माझ्या आंबेडकरांना मानणाऱ्या बहीण भावंडांनी दिल डॉ 70 फुटापेक्षा मोठा पुतळा आपण आपल्या पित्याचा सोन्याचा उभा करू शकतो. हा जगातला कधी ही कोणी न मोडणारा विक्रम ठरेलं.

तरीही जो आहे त्या पुतळ्याचे सौन्दर्य आणी पावित्रे जपणे गरजेचे आहे, त्या अनुषंगाने पुतळा पूर्ण करून कायम सिद्ध करावा आणी लातूरची शान वाढवावी. डॉ. आंबेडकर पुतळा,राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासह पार्क चे सुशोभीकरण करावे. सोबतच स्वतःला दलित समजू नये. कारण याच महामानवाने म्हणजेच आपल्या पित्याने 1956 रोजि आपल्या दलित वंशजाना बौद्ध धम्माची दिक्षा दिली आहे.

✒️पॅन्थर डॉ. राजन माकणीकर(राष्ट्रीय महासचिव)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(डेमोक्रॅटिक)मुंबई,महाराष्ट्र(मो:-9004545045)

महाराष्ट्र, मुंबई, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED