मुसळी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने व्याख्यान संपन्न

24

🔹डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारा- मोहन शिंदे (राज्य महासचिव भारत मुक्ती मोर्चा)

✒️पी.डी.पाटील(विशेष प्रतिनिधी)

धरणगाव(दि.23एप्रिल):-मुसळी ता धरणगाव येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चे औचित्य साधून ग्राम पातळीवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच , उपसरपंच ,तसेच प्रमुख वक्ते म्हणून भारत मुक्ती मोर्चा चे राज्य महासचिव मोहन शिंदे यांनी सभेस संबोधन केले.आम्ही आमच्या महानायक महानायिका यांचे कार्य समजून घेत ते समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न करणे आत्यंतिक आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी या वेळेस केले. दोन तास चाललेल्या या प्रबोधन सत्रात विविध सामाजिक विषयावर प्रकाश झोत टाकत उपस्थित लोकांना महापुरुषांच्या विचाराची पेरणी करण्यात आली

कार्यक्रम प्रसंगी ,भारत मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष गौतम गजरे , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे सिराज कुरेशी , भारतीय युवा मोर्चाचे विनोद बीजबीरे , गौतम दोडे त्याचप्रमाणे गावाचे सरपंच , गणेश ढमाले ,उपसरपंच अजम शेख , पो पाटील नितीन पाटील , ग्रामपंचायत सदस्य तसेच , भिम जन्मोत्सव समिती चे अध्यक्ष शांताराम सोनवणे , उपाध्याक्ष सुखदेव सोनवने , तसेच तरुण वर्ग ,अरुण शिरसाठ ,विनोद सोनवणे ,सुपडू सोनवणे ,महेंद्र सोनवणे ,सुखदेव खैरनार , कैलास सोनवणे ,दीपक सोनवणे (मोठे बंधू) ,दीपक सोनवणे (लहान बंधू) रुपेश कँखरे, महेंद्र शिरसाठ ,विक्की भालेराव ,अजय बाविस्कर , मच्चीन्द्र सोनवणे ,आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भीमशक्ती गृप मुसळी यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमात युवक , व महिलांची संख्या उल्लेखनीय होती . समारोप प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राहिलेले कार्य समाजापुढे नेण्यासाठी युवकांनी प्रोत्साहित होत संघटनेत सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली.