अंजनी महिला ग्रा.बि. शेती सह पतसंस्था मर्या, वावरहिरे संस्थेच्यावतीने मोफत पाणपोईची सोय

28

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

माण(दि.23एप्रिल):-तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे तापमान सरासरी 39-40 अंशापर्यत जात आहे अशा तीव्र उन्हात लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वावरहिरे येथील अंजनी महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्था वावरहिरे या संस्थेने सामाजीक बांधिलकी जोपासत वावरहिरे येथे नागरिकांसाठी पाणपोईची सोय करून दिली या पाणपोईचे उद्घाटन प्रशिक फाऊंडेशन सामाजीक संसंस्थेचे अध्यक्ष व वसुली अधिकारी नंदकुमार शिंदे यांचे हस्ते करणेत आले.

पाणी हे बहुमोल आहे. पाण्याला जीवन असे नाव देण्यात आले आहे. सर्व सजीवांचे जीवन म्हणजेच पाणी पशुपक्षी, वनस्पती, पर्यावरण आणि माणूस हे सर्वजण पाण्यावर अवलंबून असतात. मानवी शरीर अन्नाविना राहू शकेल पण पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणी हे माणसाचं सर्वस्व आहे. पाण्याविना माणसाचं जीवन अधुरे बनत चालले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे त्यामुळे वावरहिरे गावातील ” सजग नागरिक मंच वावरहिरे ” यांनी सजग राहून आपल्या गावच्या एसटी स्टँड वर आर ओ च्या शुद्ध थंड मोफत पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा लाभ घेता येईल.एक वेगळी संकल्पना राबवल्यामुळे नागरिकांच्या मध्ये एक आनंदाचे वातावरण आहे.नागरिक या सामाजिक कार्यासाठी या संस्थेला धन्यवाद देताना दिसत आहेत.

आजच्या दिवसाचा जो पिण्याच्या पाण्याचा खर्च पाणी दाते अंजनी महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित वावरहिरे यांनी केला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सातारा जिल्हा पतसंस्थांचे फेडरेशन वसुली अधिकारी श्री. एन. बी. शिंदे व त्यांचे सहकारी, वावरहिरे गावचे सरपंच श्री. चंद्रकांत वाघ, सदस्य श्री. मल्हारी जाधव, श्री. संदीप अवघडे, श्री. दत्ता भोसले, ग्राम विकास अधिकारी श्री. चंद्रकांत दनाने,” सजग नागरिक मंच वावरहिरे ” संस्थापक श्री तानाजी भोसले,अंजनी महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्था संस्थापक अध्यक्ष श्री.हेमाकांत बुट्टे, श्री. तुळशीराम यादव, श्री. आबाजी चव्हाण, श्री. मधुकर अवघडे, श्री. विष्णुपंत पांढरे , श्री. सतीश भोसले असे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.