सायकल स्नेही मंडळातर्फे रैली आणि पशुपक्ष्यांसाठी पाणपोईची व्यवस्था

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.23एप्रिल):-सायकल स्नेही मंडळाचे वतीने साप्ताहिक रैलीचे आयोजन करण्यात येत असते. सायकल चालवा, आरोग्यवान व्हा आणि पर्यावरण वाचवा या संदेशांचा प्रचार प्रसार आपल्या कृतीतून सदर मंडळ गेल्या तीन वर्षांपासून करीत आहे. नुकत्याच झालेल्या सायकल रॅलीच्या दरम्यान एक पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला. पोटेगाव गुरवळा या जंगल मार्गाने सायंकाळी भ्रमंती करताना ‌रस्तांच्या कडेला झाडाखाली पाणी साठवून ठेवून जंगलातील पशुपक्ष्यांसाठी पाणपोई ची व्यवस्था करण्यात आली. त्या करीता लागणाऱ्या पालिथीनची मदत म्हणून फिरोजभाई पठाण यांनी स्वयं प्रेरणेनी केलेली आहे.

सायकल स्नेही च्या सदस्यांनी सत्तर लिटर पाणी शहरातून जमा करून ड्रम द्वारे पाणपोईसाठी उपलब्ध करून दिले. यापुढे ही अशी व्यवस्था मंडळाचे वतीने अनेक ठिकाणी पक्षी – प्राणी यांच्या साठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.सायकल रॅली सोबतच पाणपोई च्या उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. या उपक्रमात सहभागी सायकल स्नेही मंडळाचे संयोजक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, कार्याध्यक्ष प्रा. विलास पारखी, विलास निंबोरकर, किशोर पाचभाई, प्रमोद राऊत, प्राचार्य संजय नार्लावार, प्राचार्य भांडेकर,प्रा.अविनाश गौरकर,राजू बैस,मोहीत दशमुखे आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.