काटखेडा देवीतांडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.24एप्रिल):;तालुक्यातील देवीतांडा काटखेडा येथे भीम टायगर सेनेची महिला आघाडी शाखा स्थापन करून फलकाचे अनावरण भीम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष किशोरदादा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले व विश्वभुषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती पुसदचे सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी गवई साहेब, गीताताई कांबळे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा भिम टायगर सेना, तालुका अध्यक्ष प्रभाकर खंदारे ,विष्णू सरकटे ,विनोद जाधव, लखमा नाईक, लक्ष्मण पवार, दिगंबर चव्हाण, दिपक गायकवाड प्रमुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सुजाता महिला मंडळ इटावा पुसद आंबेडकर वार्डातील महिला मंडळ यांच्या हस्ते त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पुसद पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी गवई साहेब यांनी तथागत भगवान बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच मातंग समाजांनी बुद्ध धम्म स्वीकारून एक आदर्श निर्माण केला आमच्या पूर्वजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित नागपूर येथे दिक्षा घेऊन आम्हाला बुद्धाच्या ओटीत टाकले आहे. त्यामुळे बौद्ध समाजातील परिवर्तन दिसून येत तसेच मातंग समाजामध्ये परिवर्तन करायचे असेल तर मुला-मुलींना शिक्षणाशिवाय आपल्या समोर पर्याय नाही अशा प्रकारे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनीसुद्धा आपले विचार मांडले कार्यक्रमाचे आयोजक अण्णा दोडके व भिम टायगर सेना महिला आघाडी शाखा देवी तांडा काटखेडा. शाखा अध्यक्ष माया गजानन दोडके ,उपाध्यक्ष सरिता भाऊराव जाधव सचिव बेबी हिरामण जाधव, सदस्य कमला बळीराम दोडके ,नंदा भगवान दोडके ,शीला श्रीराम दोडके ,पार्वती सखाराम दोडके, संगीता भाऊराव जाधव ,रमा पांडुरंग दोडके ,नर्मदा बाळू मानकर, विमलाबाई खिल्लारे ,सुनिता लक्ष्‍मण दोडके , येनु उमेश सुरोशे ,इंदुबाई गजानन कांबळे सविता गणेश दोडके. सपना किसन जाधव कार्यक्रमाचे प्रस्ताविक दत्ता कांबळे यांनी केले तर आभार प्रभाकर खंदारे यांनी केले