पुण्यात अमरसिंह पंडित यांच्या कन्येचा विवाह मोठ्या थाटात पडला पार

  38

  ?खा. शरद पवार यांच्या सह अनेक खासदार आमदार आणि आधिकार्यांनी उपस्थिति राहून वधु वरांना आशिर्वाद दिले

  ✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

  बीड(दि.25एप्रिल):-माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांची नात आणि माजी आ. अमरसिंह पंडित याच्या कन्या डॉ. पद्मांजली यांचा विवाह आज सकाळी ९.४५ च्या शुभमुहूर्तावर विधीवत पद्धतीने पुणे येथे संपन्न झाला. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यासह सर्वच क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सायंकाळी सात वाजता झालेल्या अक्षदा आणि स्वागत समारंभाला उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, गृहमंत्री ना दिलीपराव वळसे पाटील, ना धनंजय मुंढे, खा. रावसाहेब दानवे, माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सह मंत्री,आमदार, प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

  माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांची नात आणि माजी आ. अमरसिंह पंडित यांची कन्या पद्मांजली हिचा शुभविवाह गोविंदराव बोडके यांचे चिरंजीव मयुरेश याच्या सोबत आज सकाळी ९.४५ च्या शुभमुहूर्तावर विधिवत पद्धतीने संपन्न झाला. तसेतशच पुणे येथील लक्ष्मी लॉन्सवर सायंकाळी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वधूवरांना शुभआशिर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वासर्वा खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, राजेश टोपे, ना. धनंजय मुंडे, ना. दत्ता भरणे, ना. नरहरी झिरवाड, खा. रजनीताई पाटील, का. प्रताप पाटील चिखलीकर, आ. प्रकाश सोळंके, विक्रम काळे, बाळासाहेब आजबे, राहुल पाटील, निरंजन डावखरे, विनायक मेटे, रविंद्र फाटक, श्यामसुंदर शिंदे, दिलीपराव देशमुख, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विश्‍वास जाधव, न्यायमूर्ती साधना जाधव, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

  राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकार क्षेत्रातील मान्यवरासह बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातील आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र
  शुभेच्छा देण्यासाठी आनेकांची उपस्थिती
  प्रशासकीय क्षेत्रातील आजी माजी अधिकारी उपस्थित
  बीड जिल्ह्यातील राजकीय नेते