बीड जिल्ह्यात अपघात मालिका सुरूच, वांजरा फाट्याजवळ पती पत्नीचा जागीच मृत्यू; तीन दिवसात 12 बळी!

26

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.26एप्रिल):- जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. पाटोदा गावाजवळील वांजरा फाटा येथे कारच्या भीषण अपघातात पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी हाती आली आहे. सोमवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारमध्ये प्रवास करणारे पती पत्नी या दोघांनाही गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. मागील तीन दिवसातच बीडमध्ये झालेला हा तिसरा भीषण अपघात आहे.

मृत उस्मानाबादमधील भूमचे रहिवासी

बीडमधील पाटोदा गावाजवळ वांजरा फाटा येथे कारला हा भीषण अपघात झाला. कारमध्ये उस्मानाबादमधील भूम येथील रहिवासी अशोक देशमुख आणि संगीता देशमुख हे पती पत्नी होते. या कारचा अपघात नेमका कसा झाला, याची माहिती अद्याप समोर आली नसली तरीही एखाद्या भरधाव वाहनाने कारला धडक दिल्याचे अपघात स्थळावरील दृश्यांतून दिसत आहे. कारमधील अशोक देशमुख आणि संगीता देशमुख हे पती पत्नी जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.