सामूहिकता हिच गावाची ताकद आणि ओळख असते – आ.डॉ.रत्नाकर गुट्टे

30

🔹ईसाद येथे ओड समाज मेळावा संपन्न

✒️अनिल गंगाखेड(विशेष प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26एप्रिल):-देशात आणि राज्यात आराजकता वाढत आहे. माणसं जाती आणि धर्मात विभागली जात आहेत. माणसांच्याच झुंडी माणसावर चालून येत आहेत. अशावेळी समाजाला दिशा देणारा ग्रामीण भाग महत्वाचा वाटतो. कारण अठरा पगड जाती धर्माची माणसं गुण्या-गोविंदानं गावा-गावात राहात असतात. ऐकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असतात. संकटात ऐकमेकांना आधार देत असतात. कारण सामूहिकता हिचं गावाची ओळख असते. असे मत गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील ईसाद येथे ओड समाज मंदिर संरक्षक भिंत भूमिपूजन व भव्य समाज मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर ओड समाजाचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव सालकमवाड, जिल्हा परिषद सदस्य गणेश दादा रोकडे, किशनराव भोसले, प्रल्हादराव मुरकुटे, रासपा जिल्हाध्यक्ष संदीप पाटील,पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, माजी सरपंच रखमाजी पाटील, सर्जेराव सातपुते, भुजंगराव सातपुते, ओड समाजाचे प्रांताध्यक्ष बालाजी मसलगेकर, उपाध्यक्ष आनंदराव गनगोपले उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, तालुक्यातील मोठे गाव असूनही ईसाद गावाचा लोकव्यवहार गुण्या-गोविंदाने चालतो. त्यामुळेच माझ्या आवडत्या गावापैकी एक म्हणजे ईसाद आहे. ओड समाजाला संस्कृती आणि इतिहास आहे. आज माझा आणि ओड समाजाचे नाते अधिक घट्ट झाले आहे. योग आला की सगळं होतं. त्यामुळे केवळ ईसादच्या ओड समाजाचे नव्हे तर माझ्या संपूर्ण मतदार संघातील ओड समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. कष्टाचा घाम गाळून उदरनिर्वाह करणा-या माझा ओड समाज बांधवावर कधीही आणि कोठेही अन्याय झाला तर त्या विरूध्द सगळ्यात आधी माझा आवाज उठेल. बांधकाम करून किंवा दगड फोडून जगणारा ओड समाज प्रामाणिक आहे. ईमानदार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की, एक ईमानदार माणूस शंभर लोकांना भारी पडतो. शंभर ईमानदार लाख लोकांना भारी पडतात. अशा ओड समाज बांधवाचा मी केवळ समाज मंदिराचा नाही तर त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविल्या शिवाय राहाणार नाही. मी आमदार झाल्यापासून ईसादला आतापर्यत तब्बल सव्वा करोड रूपायांची विकासकामे केली आहेत. त्यामुळे मी तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे. परंतु भविष्यात तुम्ही सुध्दा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.

यावेळी नंदकिशोर टोकलवाड, प्रभू उरवड, हनुमंतराव डोणगावकर, बालाजी पल्लेवड, व्यंकटराव नरवाडे, शिवाजी पंदनवड, कैलास मोकमपले, प्रकाश डुबुकवड, बाबासाहेब भोसले, बाळासाहेब पौळ, ऋषी मुकदम, बबन सुरवडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी नरवडे तर आभार विठ्ठल सातपुते यांनी व्यक्त केले.

…ओड समाज संकटात साथ देणारा आहे – जि.प.सदस्य किशनराव भोसले

गावातलं राजकारण फारचं भयानक असतं. गट-तट असतात. परंतु ते केवळ काही दिवसांचेच असतात. मात्र कुणी काहीही केलं किंवा आमिष दिलं तरी दिलेला शब्द पाळून संकटात साथ देणारा समाज म्हणून ओड समाजाची ओळख आहे. माझं सगळं राजकारण केवळ आणि केवळ ओड समाजाच्या साथीवर उभारलं आहे. खरं म्हणजे मला राजकारणात ओड समाजानेचं जीवनदान दिलं आहे. त्यामुळे साहेब, तुमच्या सोबत आलेला हा समाज प्रामाणिक आहे. तो तुमच्या २०२४ च्या विजयाचा शिल्लेदार झाल्याशिवाय राहाणार नाही, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले यांनी बोलताना व्यक्त केला.