वंचित बहुजन आघाडी चा सभासद नोंदणी व पक्षप्रवेश सोहळा संपन्न.!

25

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27एप्रिल):-दिनांक 26/4/2022 रोजी वंचित बहुजन आघाडी जनसंपर्क कार्यालय पुसद येथे सभासद नोंदणी व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.वंचित बहुजन आघाडी चे यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक मोहन राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सभासद नोंदणी कार्यक्रम पुसद येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड साहेब, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्ष निरीक्षक मोहन राठोड साहेब, प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा महासचिव डी के दामोदर साहेब व जिल्हा संघटक राजकुमार ताळीकोटी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी मांडली तर सूत्रसंचालन शाखाध्यक्ष संदीप मनोहर यांनी केले.आभार प्रदर्शन तालुका महासचिव उत्तमराव मस्के सर यांनी केले.

कार्यक्रमाला पुसद शहर,पुसद तालुका व शाखा चे पदाधिकारी तसेच गाव खेड्यातून वंचित बहुजन आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला माधवराव मनवर तालुका सहसंघटक, प्रकाश खिल्लारे तालुका उपाध्यक्ष, मिलिंद पठाडे,गौतम वाहुळे,प्रदीप वाहुळे,विक्की उबाळे,शंकर करमनकर,ज्ञानेश्वर मनोवर,सरपंच हिवळणी मधुकर सोनोने,भैय्यासाहेब जोगदंडे, विक्रम राठोड,ऋतिक गडधने,अशोक जोगदंडे,करण जोगदंडे,अक्षय खिल्लारे,राहुल कांबळे,शेख विक्रम शेख अजीज, मोसिन खान,शिलानंद कांबळे, राहुल धुळे,वैभव सूर्यवंशी, देवानंद डोंगरे,अमोल धुळे,राहुल जोगदंडे,विकी चंदन,विशाल उबाळे,मोहन जाधव,गौरव बावसकर,नागेश गायकवाड, निखिल गावंडे,सुमित पाईकराव,अशोक बलखंडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.