घुग्घुस बेलोरा वर्धा नदीवरील पुलाखाली एका युवकाचा मृत्यूदेह आढळला

30

🔸हत्या कि आत्महत्या? पोलीसाचा तपास सुरु

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.1मे):-दि.३० एप्रिल २०२२ शनिवार रोजी घुग्गुस जवळच्या बेलोरा पुलाखाली एका अनोळखी युवकाचा मृत्यूदेह आढळून आला.घुग्घुस पोलीस घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाच्या पंचनामा करून बॉडीला उत्तरीय तपासणीकरिता चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले.मृत्यु पावलेला यूवक चंद्रपूर शहरातील हिंगलाज भवानी वार्ड जुनोना रोड बाबुपेठ येथील रहिवासी आहे.

असे सूत्रानुसार कळले? मृत युवकच्या हा काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने मृत्युयांची पत्नी सुनिता पवन रंगारी हि पोलिस स्टेशन रामनगर येथे बेपत्ता असल्याची रिपोर्ट दाखल केली होती.
घुग्घुस पोलीस ठाण्यात अनोळखी बॉडी बेलोरा वर्धा नदीत वार्ता मिळताच मृत्यूकाचे पत्नी व भाऊ हे जावुन सनागत करून हे माझे भाऊ आहे असे सांगण्यात आले.मृत्तकाचे रिश्तेदार भाऊ, बहिण, वहिनी व ईतर नातेवाईक पवन रंगारी च्या अपघात शंका व्यक्त करीत आहे.पोलीस काय छडा लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे