समर कॅम्प सारखे उपक्रम विद्यार्थ्यांना नवीन दिशा देण्याचे कार्य करतात:-डॉ. सुनीता धुळे

44

🔹शहरातील विद्यार्थी व पालकांचा न्यू व्हिजन स्कुलतर्फे आयोजित समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

✒️शेख फिरोज(अंबाजोगाई प्रतिनिधी)मो:-7020475287

अंबाजोगाई(दि.3मे):- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन मधून बाहेर काढून त्यांना नवी दिशा देण्याचे कार्य समर कॅम्प सारखे उपक्रमच करु शकतात असे मत डॉ. सुनीता धुळे (शेटे) यांनी व्यक्त केले .त्या अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या वतीने ३ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित विद्यार्थ्यांसाठीच्या पंधरा दिवसीय समर कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. सुनीता धुळे (शेटे) या बोलत होत्या . याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य प्रवीण शेळके ,सुप्रसिद्ध नृत्य कलाकार विनोद निकम , अनुराधा निकम , डॉ.सुनीता तोष्णीवाल उपस्थित होत्या .

समर कॅम्पचे उद्घाटन सरस्वती पूजन करून सौ . उषा रामधमी यांच्या स्वागत गीताने करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य प्रवीण शेळके यांनी केले . यावेळी शेळके यांनी सांगितले की बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाची न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या वतीने दरवर्षी समर कॅम्पचे आयोजन करण्यात येत असते .कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे यात खंड पडला होता .मात्र दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षी या समर कॅम्पचे आयोजन संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे .जवळपास ५००विद्यार्थ्यांनी या पंधरा दिवसीय समर कॅम्पमध्ये सहभाग घेतला आहे . पालक व विद्यार्थी यांचा इतका मोठा प्रतिसाद मिळाला की अक्षरशः प्रवेश पहिल्याच दिवशी बंद करावे लागले.

या समर कॅम्प मध्ये आउटडोर व इंडोअर असे विविध प्रकारचे खेळ आयोजित केले आहेत .यामध्ये चित्रकला , घोडेस्वारी , गाने , नृत्याचे क्लास ,रोबोटिक गेम , पोहणे आदीं कार्यकम आयोजित करण्यात आले आहेत . या कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना कॅप , टी शर्ट , व बॅग देण्यात येणार असल्याचे प्राचार्य शेळके यांनी सांगितले .या कॅम्पमध्ये प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ. सुनीता धुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी अशा समर कॅम्पची आवश्यकता असल्याचे सांगितले . पुढे बोलताना डॉ. धुळे म्हणाल्या की प्रत्येक गोष्टीत प्रत्येक विद्यार्थी हा परिपूर्ण असतोच असे नाही त्याला जसे शिकवाल , सांगाल तसेच तो आयुष्यात वागत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमी त्याच्या बुद्धीस चालना मिळेल अशीच शिकवण दिली गेली पाहिजे . अशा कॅम्पमधून विद्यार्थ्यांना विविध गोष्टी प्रात्यक्षिक स्वरूपात अनुभवयास मिळतात . अशाच कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यास , कलागुण व इतर परफॉर्मन्स मध्ये वाढ होण्यास मदत होते .

तसेच संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांनी आपल्या भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून सी बी एस सी पॅटर्न ची न्यू व्हिजन पब्लिक स्कुल ची स्थापना करण्यात आली .व अंबाजोगाई करांना अत्यंत कमी खर्चात शिक्षण देण्यासाठी संस्थेची स्थापना केली . या संस्थेने हजारो विद्यार्थी निर्माण केले . त्याबद्दल राजकिशोर मोदी यांचे आभार व्यक्त केले .या कॅम्पमध्ये डॉ.सुनीता तोष्णीवाल व विनोद निकम यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मोबाईल मधून बाहेर काढण्यासाठी राजकिशोर मोदी व त्यांची शैक्षणिक टीम राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार मानले .सदर कॅम्प पूर्ण करण्यासाठी न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या सर्व शैक्षणिक स्टाफ कार्यरत होता .कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु अंकिता जैस्वाल व शिवानी सिंग यांनी केले तर आभार रंजन मॅडम यांनी व्यक्त केले .