डी. टी. आंबेगावे पत्रकारिता क्षेत्रातील विशेष पुरस्काराने सन्मानित

30

🔸मराठवाडा शिक्षक आमदार मा. विक्रम काळे यांच्या हस्ते सन्मान

✒️लातूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

लातूर(दि.4मे):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांना मराठवाडा शिक्षक आमदार मा. विक्रम काळे यांच्या हस्ते दि.३ मे, २०२२ रोजी पत्रकारिता क्षेत्रातील विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचे पाचवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन दयानंद सभागृह लातूर येथे संपन्न झाले. या संमेलनात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विद्रोही पत्रकार, पत्रकारांच्या प्रश्ननाला वाचा फोडणारे डी. टी. आंबेगावे यांना पत्रकारिता क्षेत्रातील विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, राज्य महिला अध्यक्षा सुधाताई कांबळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनवणे, उपाध्यक्ष श्रीकांत चलवाड, उपाध्यक्ष महादेव पोलदासे, आनंद दणके, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर, बिसेफचे राज्याध्यक्ष प्रा. संजयकुमार मांजरमकर, राज्य कार्याध्यक्ष व्यंकट दंतराव, लातूर जिल्हाध्यक्ष रमेश हणमंते, प्रसिद्ध साहित्यिक प्रा, शरदराव गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.

डी. टी. आंबेगावे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, सभासद व पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व मित्रमंडळीनी अभिनंदन केले आहे.