ओबीसी समाज बांधव जागा हो, मतदानावर बहिष्कार टाकणारा धागा हो – लक्ष्मण राऊत

🔸आरक्षणचा शिवाय निवडणुका घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा दुर्दैवी निर्णय

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.5मे);-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गत निवडणुकांचा कालावधी मागेच गेल्या काही दिवसापुर्वी संपुष्टात आला होता. त्या नंतर लगेच निवडनुका होने आणीवार्य आसतांना देखील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रमुख्याने पुढे आसल्याने निवडणुकाचा कालावधी वाढवीन्यात आला होता. परंतु ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात याव्यात अशा प्रकारचा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला असून हा निर्णय काही निकर्ष व तरदुदिला आणुसरुन आसलातरी ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे, न्यायालयाने जरी निकाल दिला असला तरीही ओबीसी समाज बांधव जागा हो निवडणुकीवर बहिष्कार टाकणारा धागा हो आसे आव्हान प्रस्धिप्रत्राच्या माध्यमातुन ओबीसी समाजाचे युवा नेतृत्व लक्ष्मण राऊत यांनी ओबीसी समाज बांधवांना केले आहे. या संदर्भात लक्ष्मण राऊत यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने 2021 च्या आत मध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करायला हवी होती परंतु ती जाणिवपूर्वक केली गेली नाही.

ओबीसीची राजकीय स्थिती आणि ओबीसी चे मागासलेपण व ओबीसीची आजची परिस्थिती या सर्व बाबींचा अहवाल न्यायालयाने मागितला होता. परंतु सरकारला एवढे सुद्धा करता आले नाही. या देशात बहुसंख्य ओबीसी बांधव आहेत आणि सर्वच क्षेत्रात मागासलेले आहेत म्हणून या घटकाला राजकीय क्षेत्रात सुद्धा घटनात्मक आरक्षण दिले होते परंतु राजकिय संधीसाधुंना ते सुद्धा टिकविता आले नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. राजकीय आरक्षणामुळे ओबीसी समाजातील बांधव राजकीय पदावर काम करीत होते आणि या पदाच्या माध्यमातून आपल्या समाजाची सेवा करण्याची संधी त्यांना मिळत होती. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका घेण्यात येऊ नये अशा प्रकारचा एक मताने ठराव विधीमंडळाने मंजुर केला होता परंतु सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी बांधवाच्या बाजुने निकाल येईल असे वाटत असतानाच न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका दोन आठवड्यात जाहिर करण्याचे आदेश दिले असून या निकालामुळे ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे. परंतु आपण सर्व ओबीसी समाज बांधव न्यायीक प्रक्रियचा आदर करतो म्हणून भविष्यात ज्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकावर ओबीसी समाज बांधवाने बहिष्कार टाकला पाहिजे म्हणून ओबीसी समाज बांधव जागा हो, मतदानावर बहिष्कार टाकणारा धागा हो आसे आव्हान या प्रस्धिस दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातुन लक्ष्मण राऊत यांनी समाज बांधवांना केले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED