घुग्घुस यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रोखण्यात आली जडवाहतूक

28

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.१० मे):- मंगळवार रोजी घुग्घुस यंग चांदा ब्रिगेडचे चे नेते इमरान खान यांच्या नेतृत्वात घुग्घुस येथील म्हतारदेवी रस्त्यावर जाणाऱ्या जडवाहतूक रोकन्यात आले.

यामार्गांवर मागील बरेच दिवसांपासून जडवाहतूक होत आहे,हा मार्ग जीवघेण्या ठरला आहे.या मार्गांवर नेहमी मोठ्या प्रमाणात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक व इतर कामगार ये,जा करतात व तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक या मार्गांवरील ये,जा करतात मोठमोठे खड्डे पडलेले आहे.

त्यामुळे धूर, डस्ट असतात. संतप्त नागरिकांकडून वाहतूक रोखून धरली.यावेळी यंग चांदा ब्रिगेड चे नेते इमरान खान, अक्रम खान,जाहीद हाजाजी, युसुफ खान, दिलशाद शेख, राकेश दिंडीगाला, इर्शाद शेख, वसीम भाई व इतर नागरिक उपस्थित होते.