परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांचा पुतळा जाळून आंदोलन करणार

93

🔹जनशक्ती संघटनेने दिले निवेदन

✒️मोहोळ,तालुका प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कुरुल(दि.13मे):-सोलापूर जिल्ह्यातील आरटीओ अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या गैरकारभार बद्दल त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी जनशक्ती संघटनेने आंदोलन करून याबाबत सतत निवेदन दिले आहेत. मात्र अर्चना गायकवाड यांच्यावर कसलीच कारवाई परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले असल्याने अर्चना गायकवाड व त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या आयुक्त डॉ.ढाकणे यांचा पुतळा जाऊन आंदोलन करणार असल्याचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.अजित शिंदे यांना जनशक्ती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाबाराजे कोळेकर यांनी दिले आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यामध्ये आरटीओ प्रशासनाचा अंदाधुंद कारभार सुरू आहे. सगळीकडे एजंट लोकांचा सुळसुळाट झाला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बॉर्डर वर या लोकांकडून वसुली केली जाते. याबाबत सविस्तर आकडेनिहाय माहिती दिलेल्या निवेदनात दिली आहे. तरीही त्यांच्यावर कोणती कारवाई करण्याचे धारिष्ट डॉ. ढाकणे यांनी दाखविले नाही. त्यामुळे आता त्यांचाच पुतळा जाळून आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.