बेंगलोर येथील राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत शिवराज मालवी यांना 2 सुवर्ण पदक

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 15 मे):-पॅन इंडिया मास्टर्स गेम्स फेडरेशन बेंगलोर द्वारा बेंगलोर येथील पादुकोण द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलंस येथे 11 में ते 15 में दरम्यान आयोजित फर्स्ट पॅन इंडिया मास्टर्स गेम्सचे आयोजन करण्यात आले त्यामधे वेगवेगळ्या राज्यांमधुन स्पर्धक सहभागी झाले प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, हरियाणा,पंजाब, आंध्रप्रदेश,तामीलनाडु, मध्यप्रदेश,केरळ या राज्यांमधील मोठ्या संख्येने जलतरणपटू सहभागी झाले.संपुर्ण स्पर्धेत विविध वयोगटातील 300 उत्कृष्ट जलतरणपटू सहभागी झाले.

ब्रह्मपुरी येथील शिवराज मालवी हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत स्पर्धेत सहभागी झाले व आपले कौशल्य व जिद्द कायम ठेवुन 100 मिटर फ्रिस्टाइल प्रकारात 1 मिनीट 43 सेकंदात 100 मिटर अंतर पुर्ण करुन पहिला गोल्ड मेडल आपल्या नावे केला तर वैयक्तिक रिलेमध्येसुद्धा सुवर्ण पदक प्राप्त केले व स्वतःची स्पर्धेत पदक प्राप्त करण्याची परंपरा कायम राखली, त्याबद्दल त्यांचे संपूर्ण ब्रह्मपुरीकर मित्र मंडळी यांनी अभिनंदन केले व पुढे काही दिवसांनी 18मे ते 22मे दरम्यान केरळमधील त्रिवेंद्रम येथे होणा-या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.