मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि-30 जून)कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यात जगभरात आतापर्यंत अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. याच दरम्यान ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन आता भारतात २० हजार तात्पुरत्या स्वरुपाच्या नोक-या उपलब्ध करणार आहे, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. या नोक-या कंपनी ग्राहकांच्या सेवेनुसार देणार आहे. या सर्व नव्या नोक-या देशातील हैद्राबाद, पुणे, नोएडा, कोलकत्ता, जयपूर, चंदीगढ, मंगळूर, इंदोर, भोपाळ, कोइम्बतुर आणि लखनऊ या ११ शहरात दिल्या जाणार आहेत.
अ‍ॅमेझॉनच्या सर्वाधिक नोक-या या व्हर्चुअल कस्टमर सर्व्हिस प्रोग्राम यामध्ये असणार आहे. त्यामुळे सर्व कर्मचा-यांना आपल्या वेळेनुसार काम करुण्याची सुविधा मिळणार आहे. कर्मचा-यांना ग्राहकाची गरज समजून घेऊन घर बसल्या त्यांच्यासाठी उपयोगी कस्टमाईज्ड सुविधा पोहचवणे गरजेचे आहे. या सर्व सर्व्हिस ई-मेल, मेसेज, सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाईल.
या नोक-यांसाठी कुणीही अर्ज करु शकता. अर्जदार दहावी पास असणे अनिवार्य आहे. त्यासोबत त्याला इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, आणि कन्नड भाषां लिहिता, वाचता येणे गरजेचे आहे. कंपनीने स्पष्ट सांगितले आहे की, या नोक-या तात्पुरत्या असणार आहेत. कंपनीच्या गरजेनुसार आणि कर्मचा-यांच्या कामगिरीवर वर्षाच्या शेवटी त्यांना परमनंट केले जाऊ शकते, असं अ‍ॅमेझॉन इंडियाने सांगितले.

बाजार, मुंबई, राज्य, रोजगार

©️ALL RIGHT RESERVED