चंद्रपूर (नरेश निकुरे,कार्य. संपादक)

चंद्रपूर(दि-30 जून)महानगरपालिकेने उत्पन्नवाढीसाठी शहरात अनेक ठिकाणी पॉर्किंगवर शुल्क लावण्याच्या दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाला कोणताही प्रतिसाद मिळत नसताना आता अत्यंत गजबजलेल्या अशा गंज वॉर्डातील भाजी मार्केटमध्ये जाणार्‍या वाहनांसाठी पॉर्किंगशुल्क आकारण्याची तयारी मनपा प्रशासनाने सुरू केली आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे तब्बल चार महिन्यानंतर मंगळवारी होत असलेल्या आमसभेत प्रस्ताव टाकण्यात आला आहे.

चंद्रपूर हे दाटीचे शहर आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येनुसार येथे वाहतूक आणि पॉर्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. पॉर्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन वषार्पूर्वी तत्कालीन आयुक्त संजय काकडे यांनी काही जाणा निश्‍चित केल्या होत्या. मनपाच्या प्रशासकीय भवनाला लागून असलेली जागा, ज्युबिली हायस्कूलच्या समोर असलेल्या राजेधर्मराव बाबा प्राथमिक शाळेचे ग्राउंड यासह आणखी काही ठिकाणे पे-पॉर्किंगसाठी निश्‍चित करण्यात आली. मात्र, मनपा प्रशासनाची ही योजना अपयशी ठरली. या शहराला वाहतुकीची आणि पॉर्किंगची सवयच राहिलेली नाही. सोयीच्या जागेवर पॉर्किंग केली जाते. गंजवॉर्डातील भाजीमार्केट हे सर्वात जुने मार्केट आहे. या मार्केटमध्ये पॉकिंगची कोणतीही व्यवस्था नाही. किंबहुना पॉर्किंगसाठी जागाच नाही. त्यामुळे सरदार पटेल महाविद्यालयाकडून भाजी मार्केटमार्गे आझाद गार्डनकडे निघताना नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते. अशीच स्थिती गोलबाजारात सुद्धा आहे. गोलबाजारात सुद्धा पॉर्किंंगसाठी व्यवस्था नाही. महानगरपालिका प्रशासन आता गंजवॉडार्तील भाजी मार्केटमध्ये जाणार्‍या वाहनांवर पॉर्किंग शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे. हा विषय महानगरपालिकेच्या आमसभेत गाजण्याची शक्यता आहे. कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून सरकारने २४ मार्चपासून लॉकडाउन सुरू केला आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात महापालिकेची आमसभाच घेता आली नाही. आता चालू महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात मंगळवारी ही आमसभा होणार आहे. आयुक्त संजय काकडे यांची मार्च महिन्यात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी राजेश मोहिते आले. त्यांच्यासाठी चंद्रपूर नवीन नसले तरी आयुक्त म्हणून त्यांची ही पहिलीच जबाबदारी असल्याने या आमसभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

कृषिसंपदा, चंद्रपूर, बाजार, विदर्भ, हटके ख़बरे

©️ALL RIGHT RESERVED