तलवाडा कब्रस्थानातील अतिक्रमण संदर्भात आज होणारे उपोषण प्रशासनाच्या विनंतीमुळे तुर्त स्थगीत – शेख लाला

30

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधि)

तलवाडा(दि.17मे):-येथील मुस्लिम कब्रस्थानातील व्यावसायिक अतिक्रमण ऊठवन्या संदर्भात समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड, पोलिस अधिक्षक कार्यालय बीड, व तहसील कार्यालय गेवराई यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी करत आज दिनांक १८/५/२०२२ बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. याची दखल व दक्षता घेऊन संबंधित प्रशासनाने उपोषण कर्त्यांकडे काही कालावधीची मागणी करत आज होणारे उपोषण तुर्त मागे घेण्याची विनंती केल्या मुळे आज दिनांक १८/५/२०२२ रोजी होणार आसलेले उपोषण प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन अल्प वेळ व दिवसासाठी तुर्त स्थगीत करण्यात आले.

आल्याची माहिती प्रस्धिस दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातुन शेख लाला शेख अब्दुल रा. तलवाडा यांनी दिली आहे. पत्रकात पुढे शेख लाला शेख अब्दुल यांनी म्हटले आहे की आम्ही लोकशाही मार्गाने गेल्या आणेक दिवसापासुन तलवाडा येथील मुस्लिम कब्रस्थानातील व्यावसायिक लोकांनी केलेले अतिक्रमण ऊठवन्या संदर्भात न्यायीक मार्ग आवलंबत शासन व प्रशासनस्तरावर सदरील अतिक्रमण ऊठवन्याची रास्त मागणी करत असुन त्याचाच एक भाग म्हणुन आजचे उपोषण ठेवन्यात आले होते. परंतु संबंधित प्रशासनाने तात्विक वेळ मागीतली आसल्याने आजचे उपोषण तुर्त अल्प वेळ व दिवसा साठी स्थगीत करण्यात येत असल्याचे पत्रकात शेख लाला शेख अब्दुल यांनी म्हटले आहे.