शासकीय औ.प्र. संस्थेत आजादी का अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.17मे):-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे संस्थेच्या वतीने नुकताच आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांच्या हस्ते झाले. दि .११ मे रोजी व्यवसाय व विभाग निहाय स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात प्रत्येक ट्रेड निदेशकांनी आप-आपल्या विभागांची प्रशिक्षणार्थांच्या माध्यमातून स्वच्छता केली. टापटीप -सजावट यावर विशेष भर देण्यात आला. दुपारच्या सत्रात मुलींकरीता रांगोळी स्पर्धा पर्यावरण आणि आझादी का अमृत महोत्सव या दोन्ही विषयावर घेण्यात आली.

यात १० मुली सहभागी झालेल्या होत्या. दि.१२मे रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ग्लोबल वार्मिंग ,पर्यावरण ,आजादीका अमृत महोत्सव या विषयावर २६ प्रशिक्षणार्थ्यांनी चित्रे काढलीत. काढलेल्या चित्रांचे रासेयो कार्यालयात प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनीचे अवलोकन संस्थेचे प्राचार्य आणि गटनिदेशक यांनी केले. त्याच दिवशी दुपारच्या सत्रात ‌निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्किल इंडिया आणि आजादी का अमृत महोत्सव या विषयांवर २३ मुलामुलींनी निबंध लिहून काढलेत. दुपारच्या सत्रात मुला-मुलींसाठी फॅशन शो स्पर्धा नवीन वर्कशॉप ऑटोमोबाईल विभागात घेण्यात आली.‌ या शोचे उद्घाटन गडचिरोली येथील सुप्रसिध्द मिसेस इंडिया पुरस्कार प्राप्त सुंदरी मनिषा मडावी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी स्पर्धेत सहभागी मुलामुलींना मार्गदर्शन करून स्वतः कटवाक करून दाखवले.

यावेळी अतिथी म्हणून सेवानिवृत्त नायब तहसीलदार सुनील चडगुलवार , प्राचार्य संतोष साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
वरील तीन दिवसीय उपक्रमात जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी आणि निदेशकांनी स्वतः सुद्धा हिरिरीने भाग घेतला. मुख्य आयोजन समितीचे प्राचार्य संतोष साळुंके, रासेयो कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम, गटनिदेशक आनंद मधुपवार , बंडोपंत बोढेकर, श्रीकांत पुरम , चंदू समर्थ, सौ. गांगरेड्डीवार, कु. मेश्राम,कु. मल्लेलवार, कु. ताकसांडे, कु. लाडे,कु. अलाम, श्री. गोडघाटे , श्री. रोडगे‌‍, श्री.सुरकर, वाळके आदी सर्व सदस्यांनी महोत्सवाच्या आयोजनात पुढाकार घेतला.

गडचिरोली, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED