हिंदू व बौद्ध स्मशान भूमीतील लोखंडी दहन कटघर त्वरित दुरुस्त करा

41

🔹भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची मागणी

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.18मे):-येथील हिंदू व बौद्ध स्मशान भूमी तसेच बेलोरा घाटावरील अंतविधी करण्याचे लोखंडी दहन कटघर त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सुचनेनुसार भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी नपच्या मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना निवेदनातून केली आहे.
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह मुख्याधिकारी अर्शीया जुही यांची भेट घेतली व या समस्येवर चर्चा केले. याप्रसंगी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच समस्या सोडविण्याचे आश्वासन मुख्याधिकारी अर्शीया जुही यांनी भाजपा शिष्टमंडळास दिले.

घुग्घुस शहराची लोकसंख्या पन्नास हजाराच्या जवळपास असून मोठया संख्येत हिंदू व बौद्ध बांधव वास्तव्यास आहे. घुग्घुस शहराच्या मध्यभागी हिंदू व बौद्ध स्मशान भूमी आहे. घुग्घुस शहरातील हिंदू बांधवांना अंत्यविधी करण्यासाठी हिंदू स्मशान भूमीत व बेलोरा नदीच्या घाटावर जावे लागते तर बौद्ध बांधवांना बौद्ध स्मशान भूमी येथे जावे लागते. याठिकाणचे अंत्यविधी करण्यासाठी लावून असलेले लोखंडी दहन कटघर जुनाट झाल्याने पूर्णतः तुटलेले आहे. त्यामुळे हिंदू व बौद्ध बांधवांना अंत्यविधी करतांना नाहक त्रास सहन करावा लागतो. घुग्घुस शहरातील हिंदू व बौद्ध स्मशान भूमी व बेलोरा नदीच्या घाटावरील अंत्यविधी करण्याचे लोखंडी दहन कटघर त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी माजी सरपंच संतोष नुने, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, शाम आगदारी, हेमंत पाझारे, जेम्स मंत्री, श्रीराम जेऊरकर, टोनी मंत्री व उमेश दडमल उपस्थित होते.