डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संकल्प पुर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी- एस.के. भंडारे

31

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.18मे):- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना आणि समाजाला आलेल्या व येत असलेल्या विषमतेच्या अडचणी सोडवणुकीसाठी प्रचंड म्हेणत करून शेवटी भारतीय संविधानाच्या माध्यमातून विषमता नष्ट करून समता प्रथापित केली. त्यांना संपूर्ण भारत समतेच्या आधारावर असलेल्या बौद्ध धम्म प्रमाणे तयार करायचा होता.

भारत बोद्धमय म्हणजे भारत समता, स्वातंत्र्य, न्याय बंधुता, या सुत्रीवर आदर्श नागरिक करण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन करून टारगेट पूर्ती साठी टारगेट स्मार्ट असावे व ते यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करून कार्याच्या प्रायोरिटी ठरवून नंतर कार्याची अँक्शन सुरू करावी असे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव व समता सैनिक दला चे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने चैत्यभूमी,दादर येथे दहा दिवशीय राष्ट्रस्तरीय केंद्रिय शिक्षक प्रशिक्षण शिबिरात टार्गेट पूर्ती कैसे करें या विषयावर मार्गदर्शन केले.

या प्रसंगी केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख व राष्ट्रीय सचिव ऍड. एस एस वानखडे, सुषमाताई पवार, अनिल मनोहर, मोहन सावंत उपस्थित होते.या शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दला चे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते द झाले आहे. या शिबिरात विविध राज्यातील 51पदाधिकारी सहभागी झाले आहेत.