युवतींनो IAS, IPS होण्याचे स्वप्न बघा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा- प्रा. डॉ. खुशाल ढवळे

44

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.30मे):- दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा यवतमाळ जिल्हा शाखा च्या वतीने युवती प्रशिक्षण शिबिराचे कार्यक्रमाचे आयोजन बोधिसत्व बुध्द विहारात करण्यात आले होते.सर्वप्रथम तथागत भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पुजन पुष्पहाराने मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करुन करण्यात आले. आणि सामुहिक त्रिसरण पंचशील वंदना घेतली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु.प्रमिलाताई भगत,प्रमुख अतिथी आद.रविजी भगत जिल्हाध्यक्ष ,मार्गदर्शक आद.खुशाल ढवळे, आद. उषाताई खंडारे, आद. मोहन उपस्थित होते.

शिबिराचे उदघाटन आद.रवीजी भगत यांनी केले. त्रिसरण पंचशिल अर्थ प्रात्यक्षिके सह आद.भगत सर यांनी सादर केला. सिध्दार्थ गौतमाची वंशवेल व बालपण या विषयावर आद. उषाताई खंडारे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आद. मोहन भवरे यांनी दस पारमिता या विषयावर विश्लेषण केले. आद. खुशाल ढवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश या विषयावर बोलतांना ते म्हणाले की, युवतींनो उच्च स्वप्ने बघा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा व IAS, IPS बना. त्यासाठी खूप अभ्यास करा.शामली इंगोले, पारमी खोब्रागडे, सोनल पाटील, रुपेरी गेडाम ,साक्षी गजभिये या शिबिरार्थी युवतींनी मनोगत व्यक्त केले. आद.प्रमिलाताई भगत यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आद.सविताताई उके यांनी केले. आद.वंदनाताई कांनदे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास तालुका व जिल्हा शाखेचे पदाधिकारी, धम्मबांधव, धम्मभगिनी केंद्रीय शिक्षिका,केंद्रिय शिक्षक,बौध्दाचार्य उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व तालुका शाखेच्या सर्व पदाधिकारी यांनी विशेष परीश्रम घेतले.