ब्रह्मपुरीच्या ने. हि. महाविद्यालयातर्फे ‘ तंबाखू विरोधी दिन ‘निमित्त रॅली व पथनाटय

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि. 31मे):-येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय,ब्रम्हपुरीच्या 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी, नागपूर युनिट व ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने 31 मे 2022 रोजी ‘ तंबाखू निषेध दिवस ‘ साजरा करण्यात आला.

याप्रसंगी एन सी सी कॅडेट्सना धूम्रपान आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचे आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जागरूक करण्यात आले.’पर्यावरणाचे रक्षण करा’ या विषयावर पथनाट्यापूर्वी ब्रह्मपुरीतील विद्यार्थी व शिक्षक व जनतेमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराबाबत जनजागृती करणे हा या गर्ल्स र्कॅडेट्सचा मुख्य भाग होता.यावेळी प्राचार्य डॉ.एन.एस.कोकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे यांची माहितीपर भाषण झाली.एनसीसी गर्ल्स युनिटच्या वतीने तंबाखू विरोधी रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.

प्राचार्य डॉ.एन.एस.कोकोडे व उपप्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली.एन एच कॉलेज ब्रह्मपुरी येथून निघालेली ही रॅली सब्जी मंडी, शिवाजी चौक, ख्रिस्तानंद चौक मार्गे पुन्हा त्याच ठिकाणी आली. ब्रह्मपुरीच्या विविध चौकात कॅडेट्सनी पथनाट्य सादर केले व पथनात्याच्या शेवटी सर्वांनी धूम्रपान व तंबाखू पासून दूर राहण्याची शपथ घेतली .रॅली आणि पथनाट्याचा मुख्य उद्देश तंबाखूमुळे सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणावर होणार्‍या घातक परिणामांबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे, हा आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेफ्टनंट डॉ केके गिलसह एनसीसी अधिकारी एसयुओ स्वाती कामठे ,जेयुओ मंजुषा दडमल ,सार्जंट हिमानी पारधी ,सार्जंट सिमरन मोहरकर यांनी अथक परिश्रम घेतले . तसेच डॉ.आर.बी.मेश्राम, डॉ.धनराज खानोरकर ,डॉ.भास्कर लेनगुरे ,डॉ.नाकतोडे ,डॉ युवराज मेश्राम, प्रा पठाडे ,डॉ. उराडे, प्रा.रंगारी,प्रा .चंदनशिवे , प्रा. दमकोंडावार,डॉ.चौधरी , उपस्थित यावेळी होते.