समाज भवन फक्त चार लोकांना एकत्र येण्याचे ठिकाण नाही तर समाजाच्या प्रबोधनाचे, विकासाचे केंद्र बनावे – मा. ना. विजयभाऊ वड्डेटीवार

🔹बिरसा क्रांती दल चे काम बघता ब्रम्हपुरी येथील समाज भवन साठी 25 लाख च्या ऐवजी 75 लाख निधी देऊ

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.31मे):-आदिवासी समाजाला प्रबोधनाची गरज आहे. कारण या देशातील बहुजन विरोधी लोक या देशातील प्रस्थपितांना विस्थापित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामधे बिरसा क्रांती दल हे सामाजिक संघटन, सामाजिक एकता, समाज प्रबोधन करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सतत काम करत आहे आणि हे काम बघता येणाऱ्या काही काळात समाज हा नक्की एकत्र येईल. समाज भवन फक्त चार लोकांना एकत्र येण्याचे ठिकाण नाही तर समाजाच्या प्रबोधनाचे, विकासाचे केंद्र बनावे.

उच्च शिक्षण घेऊन समाजाने प्रगती साधावी. असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.ते ब्रह्मपुरी येथील बिरसा क्रांती दल, विर नारायणसिंह उईके उत्सव समिती आयोजित आदिवासी प्रबोधन मेळावा व आदिवासी समाज भवन भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. या वेळी मंचावर समाज प्रबोधन मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी उपस्थित होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी जि. प. सदस्य प्रमोद चीमुरकर, न. प. बांधकाम सभापती तथा गटनेता विलास विखार, तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, शहर अध्यक्ष हितेंद्र राऊत, गिरिजाताई उईके राज्य महिला अध्यक्षा, डी. बी. अंबुरे राज्य उपाध्यक्ष, प्रभाकर गेडाम विदर्भ संघटक, अतुल कोवे विदर्भ युवा संघटक, संतोष कुळमेथे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, जितेश कुळमेथे जिल्हा महासचिव, अभिलाष परचाके जिल्हा युवा अध्यक्ष, मधुकर कोडापे जिल्हा कोषाध्यक्ष. दिलीप कोडापे जिल्हा उपाध्यक्ष, सुधाकर मरसकोल्हे जिल्हा सचिव, आकाश गेडाम जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, लताताई पोराते जिल्हा उपाध्यक्ष महिला, प्रीती मडावी जिल्हा उपाध्यक्ष, शारदा मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष युवती, दिवाकर मेश्राम शहर उपाध्यक्ष चंद्रपूर, प्रा.डॉ.प्रकाश वट्टि, कूळमेथे तालुका अध्यक्ष ऑफ्रोट संघटना, सूरज सयाम, मनोहर दलांजे, एकनाथ सलामे, पूजा कुमरे नागपूर, मारोती जूमनाके उपस्थितीत होते.

बिरसा क्रांती दलाचे काम बघता होणारा सामाजिक सभागृह हा जिल्ह्यातील उत्कृष्ठ सभागृह असायला हवा, जाहीर केलेले 25 लाख ह्या बांधकामासाठी कमी पडतील तर त्यात 25 लाख परत देऊ व समाज भवनामधे अद्ययावत सुविधा असलेल्या वाचनालय सुरू करण्यात येईल. असे आश्वासन मा. ना.विजयभाऊ वड्डेटीवार यांनी देऊन आदिवासी समाज भवन भूमीपूजन प्रसंगी दिले. आदिवासी हे या देशाचे मूळनिवासी आहेत. परंतु आज हा समाज विकासापासून दूर आहे. म्हणून या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार नाही आणि वडेट्टीवार साहेबांशिवाय विकास नाही. हा समाज मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे मोठ्या आशेने बघत आहे. आमच्या समाजाचा उद्धार वडेट्टीवार साहेबच करू शकतात असा विश्वास डॉ. राजेश कांबळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. प्रबोधन मेळाव्याचे अध्यक्ष बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आदिवासी समाजाला आरआरएस हा विकृत करत आहे, त्या पासून आदिवासी समाजाने दूर राहिले पाहिजेत.

यावेळी पद्दोन्नती, बोगस आदिवासी मुद्दा, समाजाच्या योजना ह्या कडे लक्ष देऊन आदिवासी समाजाला न्याय मिळवुन द्यावा अशी मागनी मा. ना. विजयभाऊ वड्डेटिवार ह्यांच्या कडे करण्यात आली. देवेंद्र उईके व डॉ. उईके ह्यांनी आपल्या घराची एक रूम सामाजिक कार्यकर्ते बैठक रूम व कार्यालयासाठी देऊन सामाजिक बांधिलकी जपली. सर्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ह्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. डॉक्टरेट करणारे जूमणाके ह्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित कन्नाके तालुका अध्यक्ष बिरसा क्रांती दल ब्रम्हपुरी यांनी अथक परीश्रम घेतले व त्यांच्या सोबत मारोती मडावी, संजय कुमरे, छत्रपती तुमराम, वंदना मडावी, उषा, पायल कुळसंगे, दीपा पेंदाम, तेजस्विनी सुरपाम, सीमा सिदाम, वैशाली चिकराम, शांताताई कुळसगे, अल्काताई पेंदाम, लक्ष्मी कूळसंगे तसेच अनेक समाज बांधवानी मदत केली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED