दुसऱ्याला संपवण्यात स्वत:चा कधी आणाजी पंत झाला कळलचं नाही?

50

शरद पवारांचा एरा संपला म्हणत फडणविस स्वत:ला पवारांपेक्षा मोठे ब्राम्हण्यवादी नेते समजू लागले आहेत. आता माझ्याशिवाय महाराष्ट्रात दुसरा कुणी नेताच नाही. मी आणी फक्त मीच. ह्याच मी पणा पाई मी पुन्हा येईन अश्या किंचाळणाऱ्या पेशवाईला शह दिला तो पवारांनी आणी तुमच होत्याच न होत केल. त्याचा राग अनाजी पंताच्या रुपात कपट कारस्थानी म्हणून इतिहासात तुमची नोंद महाराष्ट्राच्या जनतेने केंव्हाच घेतलीय. तुमच्या पेक्षा जिहारी लागलय ते तुमच्या संघी ब्राम्हण्यवाद्यांना, म्हणून मराठा आपला खरा शत्रू समजून तुम्ही जे वार महाराष्ट्रावर घाव घालताय ना त्यातून तुमचा कुटील कारस्थानी भेसूर चेहरा महाराष्ट्राला दिसतोय.

दोन चार मराठा दिमतीला घेतले, त्यांच्या कडून वदवून घेतले म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात ह्या भ्रमात राहू नका. दिमतीला आर्धी मराठा फौज आहे. हे समजून माज दाखवू नका. मुघलांच्या फौजेत ही अनेक हिंदू सरदार होते ना? काय झाले?एकट्या छत्रपतींनी अठरापगड जातींना सोबत घेऊन ब्राम्हण्यवादी गद्दारांना आडव पाडून स्वराज्य निर्माण केलच ना?नंतर कपटाने शिवशाहीची पेशवाई झाली आणी पेशवाई अनाजी पंतांसाख्या कुटील कारस्थानांनी बदनाम झाली. ऐश आरामी घटकंचूकी खेळात कर्जबाजारी होऊन बर्बाद ही झाली आणी इंग्रजांच्या दावणीला बांधून घेऊन संपली.

महाराष्ट्रात जाती साठी माती खात घटकंचूकीच्या खेळात आणी नग्न शर्यतीत भाग घेऊन पेशव्यांना खुष करण्याठी अनेक ललनांची नोंद इतिहासात आहे. आज त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होतांना दिसतेय. फक्त तुमच्यासाठीच असे खेदाने म्हणावे लागेल. तुम्ही ही खुश आहात.त्यात दानवे सारखे महाराष्ट्राच्या माथी ब्राम्हण नेता बसवायचा अस जाहीर करून स्वत:ची खुर्ची मजबूत करत आहेत. फडणविस जो नेता मोठा असतो, तो दुसऱ्याला कधीच कमजोर समजून हिणवत नसतो.दुर्दैव हे की तुम्ही अजून महाराष्ट्राच्या खिजगणतीत ही कुठ बसत नाहीत. इतिहासात तर दुरची गोष्ट.कारण तुमच नेतृत्वच मुळात खुज आहे, याचा वारंवार प्रत्यय येतोय. आज पवार वयोवृध्द आहेत आणी तुम्ही तरूण. पवारांना बदनाम करून इतिहासात त्यांना खुज करण्याचा जो केविलवाण प्रकार तुम्ही चालवलाय तो ही जातीवरून? त्यात तुमच्या ब्राम्हणवादी मानसिकतेचा प्रत्यय रोज कुणाच्या न कुणाच्या विखारी पोस्ट वरुन जातीव्देषातून होतोय ना तोच तुमच्या राजकिय बर्बादीला कारण ठरणार.

पवार तरुणाईत स्वकर्तृत्वाने मुख्यमंत्री झालेत तर तुम्ही रेशीम बागेच्या लाडक्या मॉनीटरच्या रुपात प्रमोट झालेत तर मोदी शहांचे पंटर म्हणून महाराष्ट्राच्या माथी बसलेत. आणि महाराष्ट्रद्रोही ही ठरलेत. हा फरक आहे.आणि तो राहणारच. याची नोंद इतिहास मात्र नक्की घेणार.समस्त संघी ब्राम्हण्यवादी सडकी मानसिकतेला एकच प्रश्न विचारावासा वाटतो की, शरद पवार हे शरद कुलकर्णी, जोशी, पटवर्धन, लेले असते तर? तुमची काय मानसिकता असती ?
ह्या महाराष्ट्राने बाळासाहेब खेर तर सर्वाधीक काळ मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक, अल्पसंख्यांक असलेले अंतुले तसेच ब्राम्हण असलेले मनोहर जोशी असे अने जाती धर्माचे मुख्यमंत्री बघीतलेत पण पुरोगामी महाराष्ट्रात कधीच जातीवरून राजकारण वा कुणाला हिणवण्याचे प्रकार बघीतले नाहीत.पवारांच्या नावाने शंख फुकत, पवार व्देषाच राजकारण करत महाराष्ट्रात मुंढे, महाजन राजकारणात रुजलेत, वाढलेत आणि संपलेत ही. राजकारणात मोठ व्हायच असेल तर पवारांचा व्देष करा आणी मोठे व्हा हा जणू पायंडाच पडलेला दिसतोय. जानकर, खोत, पडळकर हे पवार व्देषाचेच लाभार्थी. परंतू राज्यात भाजपा सरकार आले आणि कट्टर ब्राम्हण्यवादी संघी मुख्यमंत्री आपण झालेत आणी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणी दशाच बदलली. प्रगल्भतेचा वारसा असलेल्या महाराष्ट्राला फडणविस नावाने ग्रहण लावले आणि महाराष्ट्रातील प्रगल्भ राजकारणाला उतरती कळा लावण्यात आपला फार मोठा हातभार आहे हे सिध्द झाले.

पवार आज आहेत कदाचीत उद्या नसतील ही परंतू ते गेल्यावर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख आणि त्यांच चिंतन मनन,समिक्षा होईल तेंव्हा महाराष्ट्राचा आधारवडाची कमी जाणवू लागेल.हे आपणासही माहीत आहे म्हणून त्यांना तुमच्या सारखी मुठभर संघी ब्राम्हण्यवादी मानसिकता त्यांना खलनायक ठरवायला निघालीय हे तुमच्या मनातल सत्य आहे. परंतू जातीवरून त्यांना खलनायक ठरवत असतांना तुम्ही कधी खलनायक महाराष्ट्र द्रोही ठरलेत हे तुम्हालाही नाही समजल नाही.महाराष्ट्रातला रोजचा जो नंगानाच चाललाय नव्हे चालवला जातोय ना त्या पडद्यामागचे चेहरे जनता पुरेपूर ओळखून आहे. तेंव्हा आपली पत गेली, पद ही गेल आणी आब्रू ही गेली. आता फक्त तुमच्यातला एक भेसूर खलनायक तेवढा उरलाय.

✒️हरी(मिलिंद)भिसे पत्रकार(सोलापूर)मो:-9923742372