बीड जिल्ह्यातील 360 गावांना पुराचा धोका; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

34

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.4जून):-पावसाळा अगदी तोंडावर आला आहे, तर दुसऱ्या बाजूला बीड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागही आपत्ती सोबत चार हात करायला सज्ज झाला आहे. बीड जिल्ह्यात पूर प्रवण गावे 63 आहेत, तर 360 गावांना पुराचा धोका असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये बीड तालुक्यातील 37, गेवराई तालुक्यातील 54, आष्टी तालुक्यातील 23, अंबाजोगाई तालुक्यातील 9, धारूर-वडवणी तालुक्यातील 34, परळी तालुक्यातील 30 गावांचा यामध्ये समावेश आहे. तर याचा सामना करण्यासाठी लाईफ गार्ड, लाईफ जॅकेट, रबर बोटसह प्रशासन तयार असल्याचं सांगण्यात आलंय. मान्सूनपूर्व हंगामाची तयारी जिल्हा प्रशासनाने जवळपास दोन महिन्यांपासून सुरू केलेली आहे . ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांनी, मागच्या पूर्वानुभावावर ही तयारी केली आहे.