भारत सरकार मान्यता प्राप्त भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचा चौथा भव्य राज्यव्यापी वर्धापन दिन उत्साहात साजरा

30

✒️मनोहर गोरगल्ले खेड(राजगुरुनगर,विशेष प्रतिनिधी)

खेड(दि.4जून):-भारत सरकार मान्यताप्राप्त भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचा चौथा राज्यव्यापी वर्धापन दिन टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रथम शाहू-फुले-आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व इतर अनेक महापुरुषांना पुष्पहार अर्पण, दिपप्रज्वलन करून तसेच शूरवीरांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास भिकाजी सातपुते राज्य प्रदेशाध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नागरिक समाजसेवक संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे हे होते.

कार्यक्रमाला श्री अंबादास शिंदे राज्य सरचिटणीस, व विद्रोही साहित्यिक, श्री अरविंद आंबेटकर राज्य प्रमुख सल्लागार व उच्च न्यायालय मुंबई श्री कैलास बजरंग राजपूत राज्य प्रदेश उपाध्यक्ष, डॉक्टर कल्याण मधुकर घोडके मराठवाडा अध्यक्ष, डॉक्टर मनीषा गुरव मॅडम सांगली जिल्हा संपर्क प्रमुख, तसेच कल्पनाताई गीते पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख, मा.मारुती साबळे पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल शेठ सोनवणे सचिव हे उपस्थित होते.

यावेळी कैलास सातपुते यांनी कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार संबंधी कसे काम करायचे याचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना सांगितले की पोखरा योजनेतील भ्रष्टाचार बाहेर काढला असून व सहाय्यक महसूल आयुक्त कैलास आढे यांच्यावर काही संघटना जाणून-बुजून दबाव आणत होते त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच कंपन्यांमधील ठेकेदारी ही समूळ नष्ट झाली पाहिजे व आपल्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. आपण सर्वजण या विरुद्ध लढा उभारणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला नंदुरबार, गडचिरोली, सांगली, सातारा ,तासगाव, पुणे, व संपूर्ण महाराष्ट्रातून मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात संत रोहिदास प्राथमिक आश्रम शाळेतील मुलांना गणवेश व वह्या वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अनुरिता झगडे मॅडम यांनी केले