स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगारांची वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर

🔹स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगारांची वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर

✒️वाशीम(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वाशीम(दि.6जून):- मंगरुळपिर येथे जिल्हा पातळीवरील म.रा.स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेची जिल्हा शाखा मा.सुभाषरावजी ठाकरे सभागृह पंचायत समिती, मंगरूळपीर येथे निर्माण करण्यात आली आहे. कंत्राटी कामगारांना एकत्र करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय सुचविण्यात आले व सर्वानुमते वाशिम जिल्ह्या शाखा निर्माण करण्यात आली.

यावेळी जे एस पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन), डी.एम खैरे साहेब सचिव (स्वतंत्र मजदूर युनियन,) प्रमोद हेलोडे (केंद्रीय उपाध्यक्ष मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन) प्रमोद अंभोरे (कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन परिमंडळ अकोला) डी.जी तायडे (अध्यक्ष स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटना), परमेश्वर अंभोरे (जिल्हाध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन वाशिम), संतोष इंगोले (जिल्हाध्यक्ष मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन वाशिम) महेंद्र मनवर (विभागीय सचिव मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन) वाशिम, दिनेश भगत (विभागीय अध्यक्ष मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन वाशिम) उपस्थित होते.

कार्यकारणी निवड करण्यात आली, यात सिद्धार्थ किसन कांबळे- अध्यक्ष, नवल बाबुराव कांबळे -उपाध्यक्ष, धीरज शामराव इंगोले -सचिव, वैभव अशोक धवणे- सहसचिव,प्रमोद नारायण भगत – संघटक,धीरज विजयराव इंगळे – कोषाध्यक्ष, दत्ता सुभाष गावंडे – सदस्य,निलेश बापूराव गवारगुरू -सदस्य ,कुणाल महादेवराव अगलदरे- सदस्य, विष्णू भास्कर तायडे- सदस्य इत्यादी पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन प्रशांत भगत, जिल्हा सचिव स्वतंत्र मजदूर युनियन यांनी तर आभार प्रदर्शन केतन देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED