गंगाबाई तलमले महाविद्यालायात शिवस्वराज्य दिन साजरा

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6जून):-स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आज दि. 6 जून 2022 रोजी शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला विज्ञान शाखा प्रमुख प्रा. सुप्रिया एम. ढोरे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले हे होते.

या प्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रा. सुप्रिया ढोरे म्हणाल्या कि, रयतेचा राजा कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आदर्श राज्यकारभार कसा असावा याचा परिपाठ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना प्राचार्य मंगेश देवढगले म्हणाले कि, छत्रपतींना स्वराज्य म्हणजे फक्त स्वतःचे राज्य एवढेच अभिप्रेत नव्हते तर अन्यायमुक्त शासन, शोषणमुक्त शासन, विषमतामुक्त शासन अभिप्रेत होते.

त्यांची राज्यकारभार पद्धत प्रजा केंद्रित होती. प्रजेच्या हितातच राज्याचे हित आहे या तत्वावर त्यांचा राज्यकारभार चालत होता.
या कार्यक्रमाला रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश दोनाडकर, प्रा. अनिल प्रधान, श्री उमेश राउत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार कुलकिर्ती ठोंबरे यांनी केले.