शास. औ. प्र. संस्थेत शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा: ११३ विद्यार्थ्यांची निवड

31

🔸शिकाऊ उमेदवारी योजनेमुळे कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी – विकास आडे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.7जून):-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या विविध व्यवसायाचे प्रशिक्षण घेत असलेल्या अंतिम वर्षाच्या उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २४० उमेदवार मुलाखतीसाठी हजर झाले होते त्यापैकी निवड झालेल्या ११३ उमेदवारांना कंपनीच्या वतीने ऑफर लेटर देण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विकास आडे यांच्या हस्ते झाले . अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके होते. मार्गदर्शक म्हणून धूत ट्रान्समिशन चे सुरेश औटे , संदीप कुलकर्णी, पेटीएम चे प्रतिनिधी अनुप साखरे , अशोक बुर्रेवार उपस्थित होते.

मेळाव्याचे प्रास्ताविक टीसीपीसी विभागाचे श्री आनंद मधुपवार यांनी केले. याप्रसंगी विकास आडे म्हणाले शिकाऊ उमेदवारी च्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना कंपन्यांमध्ये विविध यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण मिळत असते. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढत जाऊन आपल्या कामात आपली प्रगती होत शकते. याप्रसंगी प्राचार्य साळुंके म्हणाले की, शिकाऊ उमेदवारीमुळे औद्योगिक क्षेत्रात अद्यावत ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. सूत्रसंचालन रोडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. ममता मल्लेलवार यांनी केले.सदर भरती मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अमित बोरकुटे , भरडकर ,सौ. गांगरेड्डीवार,कु.लाडे यांचे सहकार्य लाभले.