एमपीजेची नवनिर्वाचित कार्यकारिणी गठीत

31

🔸हाफीज अन्सार तालुका अध्यक्ष तर मोहसिन राज शहराध्यक्षपदी निवड

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.11जून):- भारताला कल्याणकारी राज्य बनविण्यासाठी कल्याणकारी योजनांचे लाभ खऱ्या नागरिकांपर्यंत पोचण्याकरिता नागरिकांना संघटित करून संघर्ष करण्यासाठी मुव्हमेन्ट फॉर पीस अॅन्ड जस्वीस फॉर वेलफेअर ( एमपीजे )ही संघटना कार्यरत आहे.

एमपीजे ही एक गैर धार्मिक गैर राजकीय रजिस्टर्ड सामाजिक संघटना आहे.

संघटना देशातील नागरिकांनाउपासमारी,दारिद्र रेषेतून वर आणणे , गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पुरविणे संबंधी नागरिकांचे हक्क व अधिकार विषयी जनजागृती करण्याचे व नागरिकांना संघटित करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एम पी जे नियोजनबद्ध काम करत आहे.

संघटनेच्या 2022 ते 2024 या कालावधीकरिता प्रदेश अध्यक्ष मोहम्मद सिराज मुंबई यांची निवड करण्यात आली व राज्य कार्यकारिणी समितीत अफसर उस्मानी मुंबई, महेमुद खान जळगाव, काजीम मलिक मुंबई, अल्ताफ हुसेन नांदेड, अजीम पाशा अंबड, मोहम्मद अनिस मुंबई, जैनुल अबेदिन भुसावल , हुसेन खान अकोला, अरशर शेख पुणे यांची ची नुकतीच निवड झाली.

राज्यभरातील लोकल युनिट, शहराध्यक्ष, व तालुका अध्यक्षाची निवड प्रक्रिया सध्या सुरु आहे . याच प्रकियेचा भाग म्हणून अबरार कॉम्पलेक्स, नाग चौक एमपीजे कार्यालय येथे निवडणुक प्रक्रीया पार पडली.

शहर अध्यक्ष म्हणून मोहसीन राज, उपाध्यक्ष म्हणुन प्रकाश चव्हाण, वसीम रसुल, मिनाज अहेमद यांची तर सचिव म्हणून तौफीक खान, सह सचिव अ .जहीर , ट्रेझर म्हणून तसलीम अहेमद, प्रसिद्धी प्रमुख फिरोज अन्सारी,समीर मुस्तफा, कोषाध्यक्ष म्हणून सर्फराज अहेमद यांची निवड करण्यात आली.

हाफीज अन्सार यांची उमरखेड तालुका अध्यक्ष म्हणून गजानन भालेराव यांची तालुका उपाध्यक्ष तर प्रा . गजानन दामोदर, सह सचिव अहेमद शब्बीर पठाण ढाणकी, सुरेश ठाकरे बेलखेड यांची निवड झाली

पुढील 2 वर्षामध्ये एमपीजेचा विस्तार करून संघटनेच्या माध्यमातुन एक जनआंदोलन उभे करून कल्याणकारी योजनांचा लाभ पोहचविण्याकरिता संघर्ष करून संघटनेच्या कार्यात पुर्णपणे वाहून घेण्याचे आवाहन फिरोज अन्सारी यांनी केले. निवड प्रक्रीये मध्ये राहत अन्सारी संस्थापक सदस्य एमपीजे महाराष्ट्र उपस्थित होते.