साऊथ कोरिया येथील सिओल येथे होणाऱ्या इंटरनॅशनल मिसेस ऑस्ट्रेलेशिया स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करणाऱ्या लाईफ कोच डॉ.प्रचिती पुंडे यांना महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे विशेष सहकार्य

46

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.12जून):- साऊथ कोरिया येथील सिओल येथे 22 जून 2022 रोजी होणाऱ्या इंटरनॅशनल मिसेस ऑस्ट्रेलेशिया स्पर्धेसाठी लाइफ कोच व फॅशन मॉडेल डॉ.प्रचिती पुंडे भारताकडून प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेमध्ये 90 देशातील विश्वसुंदरी सहभागी होणार आहेत.या स्पर्धेच्या सहभागासाठी डॉ. प्रचिती पुंडे यांना वेशभूषेसाठी महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यासाठी लाइफ कोच डॉ. प्रचिती पुंडे यांनी नुकतीच नऱ्हे येथील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी प्राचार्या मंजू हुंडेकरी यांनी त्यांचे स्वागत केले. मंजू हुंडेकरी यांनी नेहमीच डॉ. प्रचिती मुंडे यांना अशा स्पर्धांसाठी नेहमीच प्रोत्साहन देत आहेत.

तसेच स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी च्या विभागप्रमुख गरिमा भल्ला या डॉ.प्रचिती पुंडे यांना नेहमीच प्रोत्साहन देत आहे त. तसेच डॉक्टर प्रचिती मुंडे यांनी महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात 9 वर्षे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम पाहिले आहे. मंजू हुंडेकरी या बऱ्याच वर्षापासून कॉस्च्युम फॅशन डिझाईन क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.त्यांनी डॉ.प्रचिती पुंडे यांना त्यांच्या मिसेस इंडिया ऑस्ट्रेलेशिया स्पर्धेच्या कॉस्च्युम साठी सहकार्य केले आहे. तसेच डॉ.प्रचिती पुंडे यांनी बऱ्याच मॉडेल्सला ग्रुमिंग दिले आहे. यावेळी मंजू हुंडेकरी, गरिमा भल्ला, डॉ.अनिता कुलकर्णी यांनी डॉ. प्रचिती पुंडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.